Pune News | महिलांवरील अत्याचारांचे विरोधात महाविकास आघाडी आक्रमक | सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन
Mahavikas Aghadi Pune – (The Karbhari News Service) – पुणे शहर व परिसरात गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचारांच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यातील सरकार टोकाचे उदासीन आहे. एकीकडे महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात प्रत्येक गावात कुठेतरी महिलांवर अत्याचार सुरू असताना राज्यातील सरकार मात्र स्वतःची जाहिरात करण्यात मग्न आहे. (MP Supriya Sule)
या सरकारला शुद्धीवर आणण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेबाबत त्यांना जाब विचारण्यासाठी खा.सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या वतीने अलका चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
गृहमंत्री राजीनामा द्या, मुख्यमंत्री राजीनामा द्या, महिला अत्याचाराने त्रस्त सरकार राजकारणात व्यस्त अशा घोषणांनी संपूर्ण डेक्कन परिसर दणाणून गेला.
या आंदोलनास प्रशांत जगताप , अरविंद शिंदे , संजय मोरे, गजानन थरकुडे, रवींद्र धंगेकर,रमेशदादा बागवे, मोहनदादा जोशी, स्वाती पोकळे, डॉ. सुनील जगताप, मंजीरीताई घाड़गे, मनाली भिलारे, गणेश नलावडे, रोहन पायगुड़े, राजश्री पाटील, संगीता तिवारी, अजीत दरेकर, तनया साळुंखे यांच्यासह महाविकास आघाडीचे शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS