Pune Cantonment Vidhansabha | Pune Congress | पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाला उमेदवारी देण्याची मागणी | काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाना पटोले यांच्याकडे मागणी 

HomeBreaking Newsपुणे

Pune Cantonment Vidhansabha | Pune Congress | पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाला उमेदवारी देण्याची मागणी | काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाना पटोले यांच्याकडे मागणी 

गणेश मुळे Jul 19, 2024 4:28 PM

Rakshabandhan festival | PMPML | पीएमपीएमएल कडून रक्षाबंधन सणानिमित्त प्रवाशांकरिता ५४ जादा बसेसचे नियोजन
MP Supriya Sule Marathi news |  रखरखत्या उन्हात  प्रवाशांच्या मदतीला धावून गेल्या खासदार सुप्रिया सुळे
Har Ghar Tiranga | हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार |  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune Cantonment Vidhansabha | Pune Congress | पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाला उमेदवारी देण्याची मागणी | काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाना पटोले यांच्याकडे मागणी

 

Pune Cantonment Vidhansabha – (The Karbhari News Service) – आगामी विधानसभा निवडणुकीत ‘पुणे कॅंटोन्मेंट विधान
सभा मतदारसंघ मधून बौद्ध समाजाला उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करण्यात आली आहे. (Pune Congress)

नाना पटोले यांना दिलेल्या निवेदनानुसार पुणे शहरातील २१४, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा, हा मतदार संघ राखीव असल्याने गेल्या तीन वेळा या ठिकाणी बौद्ध समाजाला संधी मिळाली नाही. समाजनिहाय जनसंख्ये नुसार पुणे शहरातील मागासवर्गीय समाजापैकी सर्वाधिक लोकसंख्या ही बौद्ध समाजाची आहे. तसेच पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात सुद्धा बौद्ध समाजाची संख्या अधिक  आहे. गेली २५ वर्ष पुणे शहरात उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे यावेळी बौद्ध समाजाला उमेदवारी न दिल्यास समाजात तीव्र नाराजी पसरेल आणि काँग्रेस ला मतदार संघात पराभव स्वीकारावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे कि,  जयपूर अधिवेशनाच्या ठरावा नुसार 2 वेळा उमेदवारी देऊन जर पराभव झाला असेल तर त्याला उमेदवारी देऊ नये. अशा नियमावली करण्यात आली होती. यामुळे आपल्याला विधानसभा तिकीट मिळणार नाही याची खात्री झाल्याने आणि त्यामुळे निराश झाल्याने एक इच्छुक घराणेशाही राबवू इच्छित आहेत. संबंधित इच्छुक भाजपमध्ये प्रवेश करू पाहत आहेत. तसेच काँग्रेस ला खच्ची करण्याचे काम देखील सुरु आहे. त्यामुळे आपण योग्य निर्णय घेऊन बौद्ध समाजाला उमेदवारी द्यावी. अशी मागणी नाना पटोले यांच्याकडे करण्यात आली आहे.

| भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावर असणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करा

ठराविक नेते म्हणजे पुणे शहर काँग्रेस नसून भाजपच्या उंबरठ्यावर असलेल्या नेत्यांना काँग्रेसने निवडणुकीच्या आधीच बाहेरचा रस्ता दाखवावा अशा मागणीसाठी  बहुसंख्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी  आज प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची भेट घेतली.

निवडणुकीच्या तोंडावर पुणे शहर काँग्रेस पक्षातील वातावरण प्रदूषित करून फोडाफोडीचे राजकारण करणारे नेते यांना आता सामान्य कार्यकर्ते वैतागले आहे. अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा निवडणुकीचे आश्वासन घेतलेले कधी तळ्यात कधी मळ्यात राहणारे, असे विरोधी नेत्यांना आता हाकलून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशी भावना कॉंग्रेस पदाधिकारी यांनी व्यक्त केली.

  • पदाधिकारी बदलले जाणार नाहीत

नाना पटोले यांच्यासोबत झालेल्या बैठकी वेळी के सी वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथेला हे देखील उपस्थित होते. त्यांनी सांगतिले कि, सध्या आहेत तेच पदाधिकारी विधानसभा निवडणुकीसाठी राहतील. त्यात कुठलाही बदल केला जाणार नाही. मात्र विधानसभेचा उमेदवार देताना नवीन उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. असे निर्णय या बैठकीत झाले. अशी माहिती सूत्रांनी दिली.

यावेळी बाळासाहेब शिवरकर, आनंद गाडगीळ, दीप्ती चौधरी, कमल व्यवहारे, माजी नगरसेविका वैशालीताई मराठे, सुजाता शेट्टी, लताताई राजगुरू, रफिक शेख ,मेहबूब नदाफ, अजित दरेकर, संगीता  तिवारी, माजी नगरसेवक नंदलाल दिवार, माजी नगरसेवक संतोष आरडे मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष सुजित आप्पा यादव, सर्व ब्लॉग अध्यक्ष सर्व सेलचे अध्यक्ष, एन एस सी अध्यक्ष, क्रीडा अध्यक्ष, मायनॉरिटीचे अध्यक्ष त्याचबरोबर प्रमुख पदाधिकारी, शहराचे उपाध्यक्ष शहराचे सरचिटणीस सेलचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.