Pune PMC Election Office | पुणे मनपा क्षेत्रात आचारसंहितेमुळे 22 जूनपर्यंत निर्बंध

Homeadministrative

Pune PMC Election Office | पुणे मनपा क्षेत्रात आचारसंहितेमुळे 22 जूनपर्यंत निर्बंध

Ganesh Kumar Mule May 20, 2026 8:04 PM

PMC Environment Department | पुणे महानगरपालिकेत हरित इंधनाच्या वापरासाठी बेकरी असोसिएशनची बैठक संपन्न | प्रणाली स्वीकारली नाही तर कारवाई करण्याचा इशारा 
Health check-up camp for women journalists | सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत महिला पत्रकारांसाठी दोन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन
Pune News | राज्य रिंग टेनिस संघटनेच्या अध्यक्षपदी मोहन जोशी | महासचिवपदी अनिल वरपे यांची फेरनिवड

Pune PMC Election Office | पुणे मनपा क्षेत्रात आचारसंहितेमुळे 22 जूनपर्यंत निर्बंध

Pune PMC News – (The Karbhari News Service) – भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका क्षेत्रात मंगळवार पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक विभागाचे प्रमुख प्रसाद काटकर यांनी याबाबतचे परिपत्रक सर्व खातेप्रमुख व क्षेत्रीय कार्यालयांना पाठवले आहे. (MLC Election)

पदवीधर, शिक्षक आणि स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुका होत आहेत. आयोगाने 16 स्थानिक प्राधिकरण मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम 18 मे 2026 रोजी जाहीर केला.

आचारसंहिता कालावधी  सुरुवात: 18 मे 2026, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून

समाप्ती: 22 जून 2026, निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत

या कालावधीत नवीन योजना जाहीर करणे, उद्घाटने, भूमिपूजने व राजकीय स्वरूपाच्या जाहिरातींवर निर्बंध असतील. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेत निष्पक्ष भूमिका ठेवावी, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्व अधिकाऱ्यांना सक्त ताकीद: खातेप्रमुख, उप आयुक्त (परिमंडळ 1 ते 5) व सर्व सहायक आयुक्तांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे.

भंग टाळा: कोणत्याही परिस्थितीत आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश.  जुने आदेश लागू: भारत निवडणूक आयोगाने 26/12/2016 रोजी दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करावी. त्या आदेशातील सूचनांचे पालन बंधनकारक आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांनी 18/05/2026 रोजीच्या पत्राद्वारे मनपाला आचारसंहिता लागू करण्याबाबत कळवले होते. त्यानुसार मनपा निवडणूक विभागाने तातडीने अंमलबजावणी सुरू केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: