Pune Water Supply News | पाणीकपातीमुळे टँकरची संख्या १४०० वरून १७०० वर | पाणी वितरण व्यवस्थेत मोठ्या कामाची गरज  | महापालिका प्रशासनाचा मुख्य सभेत खुलासा

Homeadministrative

Pune Water Supply News | पाणीकपातीमुळे टँकरची संख्या १४०० वरून १७०० वर | पाणी वितरण व्यवस्थेत मोठ्या कामाची गरज  | महापालिका प्रशासनाचा मुख्य सभेत खुलासा

Ganesh Kumar Mule Jun 22, 2026 5:35 PM

PMC Water Supply Department | पाणीपुरवठ्याच्या तक्रारी बाबत आता अभियंत्यावर जबाबदारी निश्चित केली जाणार  | पाणीपुरवठा विभागाचा निर्णय 
 When Pune Municipal Corporation (PMC) prepare a policy to prevent incidents of abuse and beating of officers and employees?
PMC Chief Engineer Abuse | अधिकारी, कर्मचारी शिवीगाळ, मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी पुणे महापालिका कधी धोरण तयार करणार?

Pune Water Supply News | पाणीकपातीमुळे टँकरची संख्या १४००वरून १७०० वर | पाणी वितरण व्यवस्थेत मोठ्या कामाची गरज  | महापालिका प्रशासनाचा मुख्य सभेत खुलासा

 

PMC GB Meeting – (The Karbhari News Service) – पुणे शहरात सुरू असलेल्या पाणीकपातीमुळे टँकरवरची अवलंबित्व झपाट्याने वाढले आहे. पाणीकपात सुरू केल्यापासून दररोज दिले जाणारे टँकर १४०० वरून आता १७०० पर्यंत पोहोचले आहेत. तरीही पेठ भाग, टेल एंडचे भाग या भागातून पाणी न मिळण्याच्या तक्रारी कायम आहेत. (PMC Water Supply Department)

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या मुद्द्यावर उत्तर देताना पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले की, पाण्याच्या तक्रारी कमी व्हाव्यात आणि टँकरची गरज कमी व्हावी यासाठी उपाययोजना सुरू आहेत. टप्प्याटप्प्याने टँकरची संख्या वाढवली जात आहे. आजपासून मोहम्मदवाडी, धायरी आणि बावधन येथे तीन नवे टँकर पॉइंट सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर टेल एंडच्या काही भागात सिन्टेक्स टाक्या वाढवण्याचे नियोजन आहे. तसेच मेन लाईनवरील अनधिकृत कनेक्शन तोडण्याची कारवाईही सुरू आहे.

 

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सभागृहात स्पष्ट केले की  वितरण लाइन आणि स्काडा सिस्टीम पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत नेमके किती पाणी बचत झाले हे सांगता येणार नाही. त्यांनी मान्य केले की पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे. नियोजनात चुका नसून, नागरिकांनी पाणी जपून वापरल्यास दरमहा ०.४ टीएमसी पाणी वाचवता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

सध्या धरणातून दरमहा १.२० टीएमसी पाणी घेतले जात असून, हा साठा आणखी दोन महिने पुरेल इतका आहे. पावसामुळे धरणातच्या पाण्यात अद्याप वाढ झालेली नाही. त्यामुळे पाणीकपात काही काळ कायम राहण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

महापौरांनी दूषित पाणी, लिकेज आणि टँकरमधून स्वच्छ पाणी न मिळण्याच्या तक्रारी तातडीने सोडवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: