Pune Book Festival | ‘पुणे लिट फेस्ट’मध्ये २० डिसेंबर पासून विविध क्षेत्रातील मान्यवरांना ऐकण्याची संधी
Pune Pustak Mahotsav – (The Karbhari News Service)– पुणे पुस्तक महोत्सवात २० डिसेंबर पासून तीन दिवस ‘पुणे लिट फेस्ट’ची मेजवानी मिळणार आहे. राज्यातील मान्यवरांसह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील लेखक, तज्ज्ञ यात सहभागी होणार असून, पौराणिक, लोकसंस्कृती अशा विषयापासून आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत वैचारिक, साहित्यिक चर्चेचा आस्वाद घेता येणार आहे.
ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते शिव खेरा यांच्या हस्ते शुक्रवारी (२० डिसेंबर) सकाळी अकरा वाजता पुणे लिस्ट फेस्टचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर १२ तदे १.३० या वेळेत लिव्ह व्हाइल यू आर अलाइव्ह या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर दुपारी १.३० ते २.३० या वेळेत वूमन खाकी अँड लीडरशीप या विषयावर माजी पोलिस अधिकारी मीरान बोरवणकर यांच्याशी प्रा. सी. एम. चितळे संवाद साधणार आहेत. उद्योजक गोविंद ढोलकिया यांच्याशी राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक कर्नल (नि.) युवराज मलिक बिझनेस एथिक्स अँड व्हॅल्यूज या विषयावर दुपारी २.३० ते ४ या वेळेत संवाद साधतील. राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे महाराष्ट्रधर्म वाढवावा या विषयावर सायंकाळी ४ ते ५ या वेळेत त्यांचे विचार मांडणार आहेत. राज्याचे उच्च शिक्षण संचालक, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, ज्येष्ठ अभिनेते आणि अभ्यासक दीपक करंजीकर, वैशाली करमरकर यांची वैश्विक राजकारणाचे स्थानिक सूत्र या विषयावर सायंकाळी पाच ते सहा या वेळेत चर्चा होणार आहे.
शनिवारी (२१ डिसेंबर) सकाळी ११ ते ११.३० या वेळेत लेफ्टनंट कमांडर नीरज वसिष्ठ अयोध्या टू अयुथ्थया या विषयावर, ११.३० ते १२ या वेळेत उपेंद्र राय रोल ऑफ बुक्स अँड एआय इन प्रेझेंट एरा या विषयावर बोलणार आहेत. सध्याचे आघाडीचे लेखक अक्षत गुप्ता आणि अंजुम शर्मा यांच्या दुपारी १२ ते १ या वेळेत द नागा वॉरियर या विषयावर गप्पा होणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाच्या देशव्यापी, वैविध्यपूर्ण कार्याचा वेध संघाचे प्रवक्ते सुनील आंबेकर, प्रा. नरेंद्र पाठक दुपारी १ ते २ या वेळेत घेणार आहेत. बॅटल ऑफ नॅरेटिव्ह्ज इन प्रेझेंट टाइम्स हा विषय पत्रकार राहुल शिवशंकर दुपारी २ ते ३ या वेळेत उलगडून दाखवणार आहेत. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत माध्यमे आणि साहित्य, माध्यमे आणि वाचनसंस्कृती या विषयावर सकाळचे संपादक सम्राट फडणीस, महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य संपादक पराग करंदीकर, लोकमतचे संपादक विजय बाविस्कर, तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांची चर्चा होणार आहे.
तर पुस्तक महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी, रविवारी (२२ डिसेंबर) सकाळी ११ ते ११.४५ या वेळेत लेखक वैभव पुरंदरे टिळक : द कल्चरल आयकॉन या विषयावर विचार मांडणार आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अखिलेंद्र मिश्रा ११.४५ ते १२.३० या वेळेत अभिनय अभिनेता आणि अध्यात्म या विषयाची मांडणी करणार आहेत. ज्येष्ठ निवेदक हरीश भिमानी १२.३० ते १.१५ या वेळेत मैं समय हुँ या विषयावर बोलणार आहेत. त्यानंतर १.१५ ते २ या वेळेत हिस्टॉरिकल अँड कल्चरल थिम्स ऑफ महाभारत हा विषय संदीप बालाकृष्ण उलगडून दाखवणार आहेत. २ ते २.४५ या वेळेत मुग्धा सिन्हा लिटररी टुरिझम आणि कल्चरल डिप्लोमसी या वेगळ्या विषयावर भाष्य करणार आहेत. त्यानंतर ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक अभिनेते चंद्रप्रकाश द्विवेदी २.४५ ते ३.३० ये वेळेत सिनेमा और विरासत हा विषय मांडणार आहेत. त्यानंतर ३.३० ते ४.३० या वेळेत ज्येष्ठ लेखिका डॉ. अरूणा ढेरे, लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांची लोकसाहित्य, लोकसंस्कृती समजून घेताना या विषयावर चर्चा होणार आहे. तर ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव, ज्येष्ठ लेखक सदानंद देशमुख, श्रीकांत उमरीकर यांची ग्रामीण वास्तव आणि मराठी साहित्य या विषयावर सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत संवाद रंगणार आहे.
COMMENTS