PMPML Income | तिकीट दर वाढीनंतर पीएमपीच्या दैनंदिन उत्पन्नात वाढ!
PMP Bus Ticket Price Hike – (The Karbhari News Service) – पीएमपी प्रशासनाच्या वतीने १ जून पासून तिकीट दर वाढ सुरु केली आहे. याला शहरातून विरोध झाला होता. मात्र पीएमपी प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम होते. दरम्यान या निर्णयाने पीएमपीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMPML Pune)
पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रात प्रवाशांकरीता बससेवा पुरविण्यात येते. परिवहन महामंडळाच्या बस संचलनामध्ये व प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने सुधारित स्टेज रचनेनुसार तिकिट व विविध पासेसच्या सुधारित दराची अंमलबजावणी रविवार पासून करण्यात आलेली आहे.
रविवार रोजी सुधारित स्टेज रचनेनुसार तिकिट व विविध पासेसचे दर लागू झालेनंतर परिवहन महामंडळास प्राप्त झालेले उत्पन्न व प्रवासी संख्या खालीलप्रमाणे
१. एकूण उत्पन्न – १,९७,१७,४३० रूपये
२. एकूण प्रवासी संख्या – ९,४५,९७१
३. संचलनातील बस संख्या – १,५५४
माहे मे २०२५ मध्ये परिवहन महामंडळास प्रतिदिनी सरासरी रक्कम रूपये १,४२,१५,२३१/- इतके उत्पन्न प्राप्त झाले होते. तथापि, ०१/०६/२०२५ रोजी सुधारित स्टेज रचनेनुसार तिकिट व विविध पासेसचे दर लागू झालेनंतर उत्पन्न व प्रवासी संख्येत वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. असे पीएमपी प्रशासनाच्य वतीने सांगण्यात आले.
COMMENTS