Pedestrian Day : Mayor : PMC : पादचारी दिन साजरा करणारे देशातील पहिले शहर बनले पुणे  : महापौर मुरलीधर मोहोळ 

HomeपुणेBreaking News

Pedestrian Day : Mayor : PMC : पादचारी दिन साजरा करणारे देशातील पहिले शहर बनले पुणे  : महापौर मुरलीधर मोहोळ 

Ganesh Kumar Mule Dec 11, 2021 4:16 PM

plogethon : pune : प्लॉगेथॉन २०२१ : मेगा ड्राईव्ह’ सुरू
Shivshahir : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
Ashok Saraf | अशोक सराफ यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान | पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार

पादचारी दिन साजरा करणारे देशातील पहिले शहर बनले पुणे

: महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : लक्ष्मी रस्त्याचा झालेला खुला मॉल, शहरात ठिकठिकाणी सजलेले रस्ते, पादचारी मार्गांच्या सोडवलेल्या समस्या आणि रस्त्यावर चालण्यासाठी पुणेकरांचा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद. अशा उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी पुण्यातील पहिला पुणे महापौर पादचारी दिन साजरा करण्यात आला. शिवाय या पादचारी दिनासोबतच पुणे पादचारी दिन साजरा करणारे देशातील पहिले शहर बनले.

पुणे शहरातील ठिकाणी ५०० मी लांबीचे रस्ते पादचारीपूरक निर्माण करणे, चौक पादचारी सुरक्षितता लक्षात घेऊन सुधारणा कामे करणे आणि सुरक्षित मिड ब्लॉक क्रॉसिंग सुधारणा कामे करणे या पादचारी अनुषंगे कामांचा समावेश होता.
सर्वात महत्वाचा उपक्रम लक्ष्मी रस्त्यावर “ओपन स्ट्रीट मॉल” ही संकल्पना घेऊन नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौक या सुमारे ४०० मी लांबीचा रस्ता पूर्णतः वाहनासाठी बंद करून पादचारी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला. सकाळी ११ वाजता मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात झाली. यावेळी हेमंत रासने, (स्थायी समिती अध्यक्ष), मा.विक्रमकुमार ( महापालिका आयुक्त), मा.कुणाल खेमणार ( अती. म.आ ) यांचे उपस्थित सर्व लांबिमध्ये पादचारी कामांची पाहणी केली.

संपूर्ण रस्त्यावर दोन्ही बाजूचे फूटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे केले, रस्त्याचे दोन्ही कडेला रंगीत रचना निर्माण केल्या व त्यामध्ये पथारी व्यावसायिक यांना जागा देण्यात आली, रस्त्यावर विविध ठिकाणी आकर्षक झाडे, फुले यांच्या कुंड्या ठेवणेत आल्या.
रस्त्यावर लहान मुलांना खेळण्याचे स्वरूपात प्रशिक्षण सेफ किड्स संस्थेद्वारे सोय केली होती.

सकाळी ११ ते संध्याकाळी ४ पर्यंत नागरिकांनी उस्पुर्तपणे सहभागी होऊन, या संकल्पनेस प्रतिसाद दिला. नागरिकांनी मुक्त स्वरूपात विहार व खरेदीचा आनंद घेतला. व्यापारी, पथारी व्यावसायिक व नागरिकांनी या संकल्पनेस चांगला पाठिंबा दिला
लोकांच्या सूचना व प्रतिक्रिया यातून यापुढे पुणे शहरात पादचारी सुविधा आणखी चांगल्या स्वरूपात निर्माण करणेचा प्रयत्न राहणार आहे.

पादचारी दिन हे केवळ निमित्त : महापौर मोहोळ

पादचारी दिन हे केवळ एकदिवसीय निमित्त असले तरी या निमित्ताने पादचाऱ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी, शहरातील पादचारी मार्गांची दुरुस्ती व्हावी, झेब्रा क्रॉसिंग रंगवले जावेत, भुयारी मार्गांची दुरुस्ती व्हावी, भुयारी मार्गातील विद्युत व्यवस्था आणि सीसीटीव्ही यंत्रणा सुरु व्हावी, असे अनेक उद्देश या आयोजनामागे होते, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

पाषाण-सुस रस्त्यावर ‘स्ट्रीट फॉर पीपल’

केंद्र शासनाच्या उपक्रमात भाग घेऊन पाषाण-सुस रस्त्यावर ‘स्ट्रीट फॉर पीपल’ ही संकल्पना निर्माण केली आहे. अभिनव आर्ट कॉलेज ते मुंबई-पुणे हायवे पर्यंत सुमारे ५०० मी लांबीचा रस्ता विकसित केला आहे. या रस्त्यावर वाहनासाठी तीन लेन, स्वतंत्र सायकल मार्ग, प्रशस्त पादचारी मार्ग आणि रस्त्याच्या कडेला ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था निर्माण केली असून व्यायामाची साधने, स्केट बोर्ड खेळणेची सुविधा, रोलर स्केटिंग खेळणेची सुविधा, लहान मुलांना अर्बन ९५ संकल्पनेवर आधारित खेळणेची साधने, फ्लोअर गेम उपलब्ध करून देणेत आली आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0