Pramod Nana Bhangire | भारतविरोधी विधाने करणाऱ्या महिलेविरोधात गंभीर गुन्हा दाखल, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई!

HomeBreaking News

Pramod Nana Bhangire | भारतविरोधी विधाने करणाऱ्या महिलेविरोधात गंभीर गुन्हा दाखल, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई!

Ganesh Kumar Mule May 30, 2025 2:31 PM

Hadapsar Devlopment Works | हडपसर आणि महंमदवाडी परिसरात विविध विकास कामांचे उदघाटन | शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांचे विशेष प्रयत्न
Pune : Hadapsar : पुण्यातील हडपसरमध्ये मॉर्निंग वॉकला चाललेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला
Pune | Animal Hospital | हडपसर ला होणार प्राण्यांचे हॉस्पिटल!  | भटक्या कुत्र्यांचाही केला जाणार बंदोबस्त 

Pramod Nana Bhangire | भारतविरोधी विधाने करणाऱ्या महिलेविरोधात गंभीर गुन्हा दाखल, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई!

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील महंम्मदवाडी परिसरातील मारगोसा हाइट्स सोसायटी येथे वास्तव्यास असलेल्या फराह दिबा नामक महिलेविरोधात भारतविरोधी आणि पंतप्रधानांविरोधातील आक्षेपार्ह विधाने केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर महिला सोसायटीतील महिलांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर भारतविरोधी भावना भडकावणारे संदेश, तसेच पंतप्रधानांविषयी अत्यंत अवमानकारक आणि अशोभनीय विधाने सातत्याने करत होती. यामुळे सोसायटीतील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता व सामाजिक सलोख्यावरही परिणाम होण्याची शक्यता होती.
या प्रकाराची गंभीर दखल घेत, शिवसेना पुणे शहर प्रमुख मा. प्रमोद नाना भानगिरे यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात लेखी निवेदन दिले. त्यानंतर सोसायटीतील विविध रहिवाशांनीही स्वतःच्या नावाने लेखी तक्रारी सादर केल्या. या सर्व तक्रारींच्या आधारे भारतीय दंड संहिता कलम 152, 196, 197, 352 आणि 353 अंतर्गत काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, “कोणताही भारतीय नागरिक अशा देशविरोधी आणि राष्ट्रनायकांविरोधातील विधाने सहन करणार नाही. शिवसेना म्हणून आम्ही भारतीय अस्मिता आणि पंतप्रधानांचा अपमान करणाऱ्या कोणत्याही कृत्याचा तीव्र निषेध करतो व कायद्याच्या माध्यमातून कठोर कारवाईची मागणी करतो.”

सदर प्रकरणाची पुढील चौकशी काळेपडळ पोलीस प्रशासनामार्फत सुरू आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: