PMC Health Department | पुणे शहरातील नागरिक, सोसायटी चेअरमन यांना महापालिका आरोग्य विभागाचा इशारा!
Pune Rain – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील नागरिक, सोसायटी चेअरमन, आस्थापना प्रमुख यांना पुणे महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने म्हटले आहे कि, शहरात मान्सूनचे आगमन झाले असून माहे जून पासून पारेषण काळ सुरु होत आहे. पावसाळ्यात विविध ठिकाणी पाणीसाठे निर्माण होऊन डास उत्पत्ती निर्माण झाल्याने झिका (Zika), डेंग्यू (Dengue), चिकुनगुनिया अशा कीटकजन्य आजाराच्या (Insect Borne Diseases)साथी पसरू नये याकरीता आपल्या मार्फत काळजी घेण्यात यावी. आपल्या आवारातील पाणीसाठ्यात डास उत्पत्ती आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा आरोग्य विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉ निना बोराडे यांनी दिला आहे. (Pune Municipal Corporation Health Department)
अशी घ्यायची आहे काळजी
१) कुंडी / मनीप्लांट यामधील पाणी नियमित बदलणे, तसेच कुंडीखाली प्लेट ठवू नये.
२) फ्रीज मागील ट्रे व कुलर यामध्ये पाणी साचू देऊ नये.
३) घरातील ड्रम / बॅरल यांना झाकण बसविणे.
४) टेरेस व जमिनीवरील टाकी / हौद यांना नेहमी झाकण लावून ठेवावे.
५) निरुपयोगी वस्तूंमध्ये पाणी साठत असल्याने टेरेस / पार्किंग येथील भंगार साहित्याची विल्हेवाट लावून आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
६) कमळकुंड, कांरजे, धबधबे यामध्ये गप्पी मासे पालन करावे.
७) आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा.
८) ड्रेनेज चेंबर झाकणावरील हॅडल मधील होलमध्ये पाणी साठू नये याकरीता त्यामध्ये वाळू / माती भरावी.
९) मोठ्या गृहरचना सोसायट्या तसेच चित्रपट गृहे / माँल / वाहन सर्व्हिसिंग सेंटर्स मधील पावसाळी जाळ्या, पावसाळी लाईन्स व पार्किंग मधील तळघरात साठलेले पाण्याचा निचरा करावा.
१०) पत्र्यावरील ताडपत्रीमध्ये तसेच पावसाळी पन्हाळी मध्ये पावसाचे साठणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.
११) एडीस इजिप्ती डास दिवसा चावत असल्याने नागरिकांनी पूर्ण बाह्याचे कपडे परिधान करावे व डास प्रतिबंधक मलम यांचा वापर करावा.
१२) दिवसा विश्राम करणाऱ्या नागरिकांनी मच्छर दाणीचा वापर करावा.
१३) डासोत्पत्ती होण्यायोग्य पाणीसाठे जसे निर्माणाधीन बांधकाम निदर्शनास आल्यास कीटक प्रतिबंधक विभागाशी ०२० – २५५०८४७४ या क्रमाकांवर संपर्क साधावा.
COMMENTS