Prajit Nair IAS | सुस गावातील स्वच्छतेची पाहणी; अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या उपाययोजनांच्या सूचना

Homeadministrative

Prajit Nair IAS | सुस गावातील स्वच्छतेची पाहणी; अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या उपाययोजनांच्या सूचना

Ganesh Kumar Mule Aug 19, 2026 9:03 PM

PMC Solid Waste Management | महापालिका घनकचरा विभागाच्या  निरुपयोगी वस्तू संकलनाच्या महाअभियानाला नागरिकांचा  उस्फुर्त प्रतिसाद  | जमा झालेल्या कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने केली जाणार प्रक्रिया!
Sinhgadh Road Ward Office | सिंहगड रोड परिसरात ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ अंतर्गत भव्य श्रमदान!
Pune PMC News | अखेर भूमी ग्रीनच्या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी | प्रशासन आणि सभागृह नेते म्हणाले, हा आजपर्यंतचा सर्वात कमी दर!

Prajit Nair IAS | सुस गावातील स्वच्छतेची पाहणी; अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या उपाययोजनांच्या सूचना

बालेवाडी-बाणेरमधील कचरा वर्गीकरण शेडचीही केली पाहणी

 

Sus Garbage – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सुस गावातील स्वच्छता व्यवस्थेची पाहणी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्रजित नायर यांनी  सकाळी केली. परिसरातील स्वच्छता अधिक प्रभावी आणि नियमित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. (Pune Solid Waste)

19 ऑगस्ट रोजी झालेल्या या पाहणी दौऱ्यात नायर यांनी परिसरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती घेताना कामादरम्यान येणाऱ्या अडचणीही जाणून घेतल्या.

नियमित पाहणीचे निर्देश
सुस परिसरातील स्वच्छता व्यवस्था सातत्याने सुरळीत राहावी यासाठी संबंधित परिमंडळाचे उपायुक्त, डीएसआय आणि एसआय यांनी नियमितपणे पाहणी करावी, असे निर्देश नायर यांनी दिले. स्वच्छतेची सद्यस्थिती तपासून जिथे त्रुटी आढळतील तेथे तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

नव्याने समाविष्ट झालेल्या भागांमध्ये स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम, नियमित आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी मनपाच्या वतीने आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कचरा वर्गीकरण शेडचीही केली पाहणी
पाहणी दौऱ्यात बालेवाडी आणि बाणेर येथील कचरा वर्गीकरण शेडलाही भेट देण्यात आली. कचरा संकलन आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी वाहन व्यवस्थापन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

तसेच परिसरातील नागरी कामांचे योग्य नियोजन करून आवश्यक कामांना प्राधान्य देण्याबत संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले.


या पाहणीवेळी सभासद मयुरी कोकाटे, घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे तसेच मनपाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये स्वच्छता आणि मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी मनपाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. त्याच भाग म्हणून हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता, असे प्रशासनाने सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: