Dr Vishwajeet Kadam | गणेशोत्सवाच्या आधी रस्ते, वीज, पाणी व वाहतूक कोंडी या मुलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे – डॉ. विश्वजित कदम

Homeadministrative

Dr Vishwajeet Kadam | गणेशोत्सवाच्या आधी रस्ते, वीज, पाणी व वाहतूक कोंडी या मुलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे – डॉ. विश्वजित कदम

Ganesh Kumar Mule Aug 19, 2026 8:44 PM

PMC Pune Budget 2026-27 | पीएमपी बळकटीकरणावर भर | मेट्रो विस्तारासह एकात्मिक वाहतूक आराखडा | ५४ किमी भुयारी रस्ते
Hadapsar-Wagholi-Manjari Road | हडपसर-मांजरी-वाघोली रस्त्यासाठी सिरम कडून 26 कोटींचा निधी | रस्त्याला विलू पुनावाला यांचे नाव देण्याबाबत सरकारची शिफारस
PMC Election 2022 | महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर  | बऱ्याच प्रस्थापित नगरसेवकांना धक्का 

Dr Vishwajeet Kadam | गणेशोत्सवाच्या आधी रस्ते, वीज, पाणी व वाहतूक कोंडी या मुलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे – डॉ. विश्वजित कदम

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील विविध प्रलंबित विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा तसेच शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांबाबत माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या सोबत काँग्रेस शिष्ठ मंडळाने  १७ ऑगस्ट  रोजी पुणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. (Pune PMC News)

या भेटीदरम्यान पुणे शहरातील रस्ते, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, उद्याने, पथदिवे तसेच विविध विकासकामे यासंदर्भातील नागरिकांच्या समस्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.

शहरातील अनेक भागांमध्ये विकासकामे प्रलंबित असून, काही ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा दर्जा आणि कामांची गती याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे संबंधित विभागांनी विकासकामांना गती देऊन कामांची गुणवत्ता राखावी, नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली.

तसेच पुणे शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विकासकामांचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

“पुणे शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत नागरी सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. विकासकामांमध्ये कोणतीही दिरंगाई किंवा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही करावी,” अशी भूमिका मा. विश्वजित कदम यांनी यावेळी मांडली.

सदर निवेदनातील विविध मागण्यांवर सकारात्मक विचार करून संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात आणि नागरिकांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यात यावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

मुख्य मागण्या:-
• १ . शहरातील सर्व खड्ड्यांची तातडीने शास्त्रीय पद्धतीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी.
• २ . सर्व फुटपाथ अतिक्रमणमुक्त करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित व वापरण्यायोग्य
करावेत.
• ३ . वाहतूक कोंडीवर तातडीने कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी
करावी.
• ४. शहरातील सर्व भागांना समान व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी शास्त्रीय पाणी
नियोजन करावे.
• ५. टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी.
• ६. ड्रेनेज, नाले व पावसाळी पाण्याच्या निचरा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक
कामे पूर्ण करावीत.
• ७. सिंहगड रोडसह सर्व पूरप्रवण भागांसाठी कायमस्वरूपी पूरनियंत्रण आराखडा तयार
करावा.
• ८. सर्व अनधिकृत जाहिरात फलक व होर्डिंग्ज तातडीने हटवून संबंधितांवर कठोर
कारवाई करावी.
• ९. संशयास्पद व तक्रारी असलेल्या महानगरपालिका निविदांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी
करावी.
• १०. निविदा प्रक्रियेत पारदर्शकता, खुली स्पर्धा व समान संधी सुनिश्चित करावी.
• ११. विकासकामांची स्वतंत्र गुणवत्ता तपासणी करून निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांसह
संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी.
• १२. आगामी गणेशोत्सवापूर्वी पुणे शहर खड्डेमुक्त, अतिक्रमणमुक्त आणि वाहतूक सुरळीत
करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.

पुणे शहराच्या सर्वांगीण व नियोजनबद्ध विकासासाठी प्रशासनाने सकारात्मक आणि गतिमान पावले उचलावीत, अशी अपेक्षा  विश्वजित कदम यांनी व्यक्त केली.
त्यावेळी माजी. मंत्री, विश्वजित कदम  यांच्या सोबत गटनेता. 3 ॲड.रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम, शहराध्यक्ष (पूर्व)  दीप्ती ताई चवधरी, शहराध्यक्ष (पश्चिम) प्रशांत जगताप, काँग्रेसचे सर्व सभासद, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: