Dr Babasaheb Ambedkar Statue Pune | पुणे कराराचा ऐतिहासिक वारसा जपला जाणार; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव मंजूर!

पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत पुणे कराराचा वारसा जतन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासंदर्भातील ठराव मंजूर.

HomeBreaking News

Dr Babasaheb Ambedkar Statue Pune | पुणे कराराचा ऐतिहासिक वारसा जपला जाणार; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव मंजूर!

Ganesh Kumar Mule Nov 19, 2026 7:11 AM

Rahul Gandhi | राहुल गांधी यांच्यावर दाखल केलेल्या खोट्या FIR च्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे निषेध आंदोलन
Home Minister Amit Shah | देवेंद्र फडणवीस व अमित शहांनी माफी मागून राजीनामा द्यावा : प्रशांत जगताप
Book Distribution | “भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त २५ हजार पुस्तके वाटप “

Dr Babasaheb Ambedkar Statue Pune | पुणे कराराचा ऐतिहासिक वारसा जपला जाणार; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव मंजूर!

| सुहास टिंगरे यांच्या पुढाकाराला यश; स्थायी समितीनंतर पुणे महापालिकेच्या मुख्य सभेचीही मंजुरी

 

Suhas Tingre NCP – The Karbhari News Service – पुणे कराराचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासह भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा गौरव करण्याच्या दृष्टीने नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य मा. सुहास विजय टिंगरे यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी सूचक म्हणून मांडलेला आणि स्थायी समितीत यापूर्वी मंजूर झालेला महत्त्वपूर्ण ठराव आज पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत (सर्वसाधारण सभेत) मंजूर करण्यात आला. (PMC General Body Meeting)

सुहास विजय टिंगरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वपूर्ण विषयाला आता मुख्य सभेचीही मंजुरी मिळाली असून, पुणे कराराच्या ऐतिहासिक स्मृती जतन करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.

पुणे कराराचा ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणार!

पुणे करार हा भारतीय सामाजिक आणि राजकीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या ऐतिहासिक घटनेच्या माध्यमातून सामाजिक समता, प्रतिनिधित्व आणि वंचित घटकांच्या हक्कांच्या प्रश्नांना महत्त्व प्राप्त झाले. या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व आणि त्यामागील विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने पुणे कराराच्या स्मृतींचे जतन करणे आवश्यक आहे.

याच उद्देशाने नगरसेवक सुहास विजय टिंगरे यांनी पुणे कराराचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या दृष्टीने हा ठराव मांडला होता.

स्मारक, संग्रहालय आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन

या प्रस्तावाच्या माध्यमातून पुणे कराराच्या ऐतिहासिक महत्त्वाचे जतन करणे, स्मारक व संग्रहालयाच्या संकल्पनेला चालना देणे, ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन करणे तसेच नव्या पिढीला या ऐतिहासिक घटनेची माहिती उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाची शिकवण समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल.

स्थायी समितीनंतर मुख्य सभेचीही मंजुरी; सुहास टिंगरे यांच्या पुढाकाराला यश!

सुहास विजय टिंगरे यांनी सूचक म्हणून मांडलेल्या या ठरावाला प्रथम स्थायी समितीची आणि आज पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेची मंजुरी मिळाली आहे. पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा जतन करणे, महापुरुषांच्या विचारांचा सन्मान करणे आणि सामाजिक समतेचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने सुहास विजय टिंगरे यांनी घेतलेला हा पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: