Annasaheb Waghire College | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण
Pune News – (The Karbhari News Service) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब वाघिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, ओतूर येथील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलेला, कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी महाविद्यालयीन स्तरावर वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये क्रीडा विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग, विद्यार्थी विकास मंडळ आणि शैक्षणिक क्षेत्रात विद्यापीठीय व महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षांमध्ये गुणानुक्रमे प्रथम क्रमांक आलेल्या, तसेच उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवान विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे व प्रसिद्धी प्रमुख डॉ. वसंत गावडे व सांस्कृतिक प्रमुख डॉ. राहुल पाटील यांनी दिली.
सदर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी राष्ट्रपती पदक विजेते सहाय्यक पोलीस आयुक्त, गुप्तवार्ता विभाग, मुंबई येथील मा. श्री. अरुण डुंबरे, अर्जुन पुरस्कार विजेत्या ऑलिंपियन, सावरपाडा एक्सप्रेस मा. सौ. कविता राऊत-तुंगार, ज्युनिअर मकरंद अनासपुरे प्रा.महादेव वाघमारे, ओतूर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय.मा.श्री.लहू थाटे, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि कांदिवली पोलीस स्टेशन मुंबई येथील ए.पी.आय.मा. श्री. प्रणित पारधी आणि ओतूर पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. मा.श्री.संदीप आमने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. रमेश शिरसाट यांनी केले. महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला.
माजी विद्यार्थी आणि कांदिवली पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. मा. श्री. प्रणित पारधी मनोगतात म्हणाले, “विद्यार्थ्यांनी राज्यसेवा परीक्षेची तयारी विद्यार्थी दशेपासून कशाप्रकारे करावी? अभ्यासाचे नियोजन कशाप्रकारे करावे”. या विषयी माहिती दिली. ओतूर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. मा.श्री. लहुजी थाटे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून आपली वर्तणूक ठेवावी. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत चांगल्या सवयी अंगी बाळगल्या पाहिजे. येताना जाताना नियमांचे पालन करावे” असे आव्हान केले. ज्युनिअर मकरंद अनासपुरे प्रा. महादेव वाघमारे यांनी आपल्या मिमिक्री मध्ये मकरंद अनासपुरे यांचा आवाज काढून विद्यार्थ्यांना मनोरंजनाबरोबर प्रबोधन केले.
‘गाढवाचं लग्न’ आणि ‘कायद्याचे बोला’ या सिनेमांमधील डायलॉग म्हणून दाखवले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलेला चांगली दाद दिली. अर्जुन पुरस्कार विजेत्या ऑलिंपियन मा. श्री. कविता राऊत-तुंगार म्हणाल्या “आपण कोणत्याही वयामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यशस्वी होऊ शकतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी गरज आहे ती फक्त प्रामाणिक आणि योग्य दिशेने कष्ट करण्याची”हे स्वतःच्या उदाहरणातून त्यांनी सांगितले. मा. श्री. अरुण डुंबरे यांनी मनोगतामध्ये आपला राष्ट्रपती पदका पर्यंतचा संघर्षमय जीवनपट अनेक उदाहरणांमधून विद्यार्थ्यांसमोर उलगडला आणि महाविद्यालयाने केलेली प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी महाविद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांसाठी रक्कम रुपये. ११,१११/- सहाय्यता निधी म्हणून सुपूर्द केला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे यांनी अध्यक्षीय मनोगतातून ‘महाविद्यालयाची पूर्वपिठिका ते भविष्यकाळातील योजना’ याविषयी सविस्तर माहिती दिली. वार्षिक स्नेह संमेलनामध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीने ३० सांस्कृतिक देशभक्ती, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी लावणी, मिमिक्री, एकपात्री प्रयोग, गायन इ. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांना उत्तुंग प्रतिसाद दिला. आभार उपप्राचार्य डॉ. कल्याण सोनावणे यांनी मांडले. तर सूत्रसंचालन डॉ. विनायक कुंडलिक व डॉ.निलेश काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राहुल पाटील, शा.शि. संचालक डॉ. उमेशराज पनेरू, एन.सी.सी.चे लेफ्टनंट डॉ. निलेश हांडे, एन.एस.एसचे कार्यक्रमाधिकारी डॉ. निलेश काळे, एस.डी.ओ चे प्रमुख डॉ. नंदकिशोर उगले, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. अमृत बनसोडे, कार्यालयीन अधीक्षक श्री. रमेश गिरमकर इ.सहकार्य केले. त्याचप्रमाणे वरिष्ठ, कनिष्ठ व व्यावसायिक अभ्यासक्रमातील सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
COMMENTS