PMPML Special Meeting | पीएमपीएमएलसमोरील विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेची खास सभा | स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती 

Homeadministrative

PMPML Special Meeting | पीएमपीएमएलसमोरील विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेची खास सभा | स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती 

Ganesh Kumar Mule Jun 25, 2026 9:30 PM

Mother Support Group | मातांकडून मिळाला गर्भवतींना कानमंत्र | मदर सपोर्ट ग्रुपची मुहुर्तमेढ
Chitale Bandhu Mithaiwale | मिठाई, फरसाण,डेअरी असोसिएशनची कार्यकारणी जाहीर
Diwali Gifts | Tax | दिवाळीला मिळालेल्या भेटवस्तूंवर कर भरावा लागेल का?  |  भेटवस्तूंवरील कराचे गणित काय आहे ते जाणून घ्या

PMPML Special Meeting | पीएमपीएमएलसमोरील विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेची खास सभा | स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

 

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) – शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पीएमपीएमएलसमोरील विविध प्रलंबित प्रश्नांचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेची खास सभा आयोजित करणार असून, त्याची तारीख गटनेत्यांच्या बैठकीत निश्चित करण्यात येईल अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

भिमाले म्हणाले, “आज स्थायी समितीच्या बैठकीत पीएमपीएमएल संदर्भात विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी सविस्तर चर्चा करण्यासाठी खास सभा घेण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. सेवा अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रवाशाभिमुख करण्यासाठी बस खरेदी, ताफ्याचे आधुनिकीकरण, वारंवार रस्त्यात बंद पडणाऱ्या बसची समस्या, कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक अडचणी, निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन व इतर आर्थिक देयके, मनुष्यबळाची उपलब्धता, देखभाल-दुरुस्ती व्यवस्था तसेच प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा खास सभेत सविस्तर आढावा घेण्यात यावा असे सुचविण्यात आले.”

यावेळी पीएमपीएमएल प्रशासनाकडून विद्यमान बस ताफा, नव्या बस खरेदीची प्रक्रिया, आर्थिक स्थिती, कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रलंबित प्रश्न, बस देखभाल व्यवस्था, महसूल वाढीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच भविष्यातील नियोजनाबाबत सादरीकरण करण्याचे निर्देश
भिमाले यांनी दिले.

भिमाले म्हणाले, “पीएमपीएमएल ही पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांची जीवनवाहिनी असून प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे केवळ समस्यांवर चर्चा न करता कालबद्ध कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर खास सभेत भर दिला जाईल.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: