Shrinath Bhimale on Water Tanker | टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी तातडीने एसओपी तयार करा | स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचे आदेश

Homeadministrative

Shrinath Bhimale on Water Tanker | टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी तातडीने एसओपी तयार करा | स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचे आदेश

Ganesh Kumar Mule Jun 25, 2026 9:10 PM

Congress Vs PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापारी आणि जनता भिकारी ! मोहन जोशी | गॅस सिलिंडरवर मर्यादा लावून मोदी सरकारकडून जनतेची क्रूर थट्टा
Pune Rain | Tree Fall | शहरात परवाच्या पाऊसाने शंभरहून अधिक ठिकाणी झाडपडीच्या घटना
Arvind Shinde | PMC Pune | महापालिकेच्या बांधकाम विभागावर अरविंद शिंदे यांचे आहे लक्ष! | महापालिका आयुक्त यांच्याकडे केल्या या मागण्या | वाचा सविस्तर 

Shrinath Bhimale on Water Tanker | टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी तातडीने एसओपी तयार करा | स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचे आदेश

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – शहरात वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने तातडीने सर्वसमावेशक स्टँडर्ड ऑपरेटिंग  प्रोसीजर (SOP) तयार करावी, असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला दिले. (Pune Water Supply)

भिमाले म्हणाले, “शहरात टँकरच्या मागणीत सातत्याने वाढ होत असताना अनेक भागांमध्ये चढ्या दराने पाणी विक्री, टँकर उशिरा पोहोचणे, जीपीएस प्रणालीचा अभाव, रस्त्यांवरील अपघात, पाण्याच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारी आणि नियमनाचा अभाव अशा गंभीर समस्या समोर येत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून एकसमान आणि प्रभावी कार्यपद्धती निश्चित करणे आवश्यक आहे.”

बैठकीत प्रशासनाकडून शहरातील टँकर पुरवठ्याची सद्यस्थिती, महापालिकेचे व खासगी टँकरची संख्या, टँकर भरणा केंद्रांची क्षमता, अधिकृत दर, अपघातांची आकडेवारी, चालकांची पात्रता, जीपीएस यंत्रणा, ऑनलाइन बुकिंग व्यवस्था, पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी आणि नियंत्रण कक्षाबाबत सविस्तर माहिती मागविण्यात आली.

स्थायी समितीने एसओपीमध्ये अधिकृत दरपत्रक जाहीर करणे, प्रत्येक टँकरवर दरफलक लावणे, सर्व टँकरमध्ये जीपीएस बसविणे, नागरिकांसाठी मोबाईल अॅपद्वारे टँकर ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध करणे, ऑनलाइन आणि हेल्पलाईनद्वारे पारदर्शक बुकिंग व्यवस्था सुरू करणे तसेच “पहिली मागणी – पहिला पुरवठा” हे तत्त्व लागू करण्याचे निर्देश दिले.

याशिवाय टँकरच्या सुरक्षिततेसाठी वेगमर्यादा निश्चित करणे, शाळा व रुग्णालय परिसरात विशेष नियम लागू करणे, चालकांचे नियमित प्रशिक्षण, वैद्यकीय तपासणी, मद्यपान व अमली पदार्थ चाचणी, परावर्तित पट्ट्या, सुरक्षा दिवे, ब्लाइंड स्पॉट मिरर, रिव्हर्स कॅमेरे आणि अलार्म प्रणाली अनिवार्य करण्याची सूचना करण्यात आली.

पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रत्येक टँकरमधील पाण्याची नियमित नमुना तपासणी, क्लोरीनेशन, दूषित पाणी पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई तसेच सर्व खासगी टँकरची नोंदणी, वार्षिक फिटनेस प्रमाणपत्र आणि नियमभंग करणाऱ्यांची काळी यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले.

नागरिकांच्या तक्रारींच्या त्वरित निवारणासाठी २४x७ हेल्पलाईन सुरू करणे, २४ तासांत तक्रारींचे निराकरण करणे, पाणीटंचाईग्रस्त भागांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करणे तसेच रुग्णालये, शाळा, पोलीस ठाणी आणि अग्निशमन केंद्रांना प्राधान्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0