Bhavesh Kasabe on Tulajabhavani | तुळजापूरच्या पदयात्री भाविकांसाठी भावेश कसबे मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम
Tulajapur Darshan : The Karbhari News Service) – तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांना दिलासा देण्यासाठी भावेश कसबे मित्र मंडळ, उपळे दुमाला यांच्या वतीने बार्शी-तुळजापूर मार्गावरील निंबळक पाटीजवळ मोफत पिण्याचे पाणी व केळी वाटप करण्यात आले. (Upale Dumala News)
पायी प्रवास करणाऱ्या भाविकांना उन्हामुळे होणारा त्रास आणि थकवा लक्षात घेऊन मित्र मंडळाने हा उपक्रम राबविला. मार्गावर उभारण्यात आलेल्या स्टॉलवरून भाविकांना पाणी व केळीचे वाटप करण्यात आले. या सुविधेचा अनेक भाविकांनी लाभ घेतला.

वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल कादबाने व पोलीस हवालदार पवार यांनी उपक्रमस्थळी भेट देऊन मित्र मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.
‘भाविकांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असून, त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच आमच्या कार्याचे फलित आहे. आगामी काळातही मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात येतील,’ असे भावेश कसबे यांनी सांगितले.
या उपक्रमात भावेश कसबे यांच्यासह मित्र मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.

COMMENTS