PMPML Employees Promotion | पीएमपी कर्मचारी पदोन्नती प्रकरण | चौकशी समितीत पीएमपी अधिकारी नको |शिवसेना शहर प्रमुख यांच्यासह  माजी नगरसेवकांची मागणी

Homeadministrative

PMPML Employees Promotion | पीएमपी कर्मचारी पदोन्नती प्रकरण | चौकशी समितीत पीएमपी अधिकारी नको |शिवसेना शहर प्रमुख यांच्यासह  माजी नगरसेवकांची मागणी

Ganesh Kumar Mule Feb 06, 2026 7:48 PM

PFI Vs BJP | पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संस्थेवर बंदी घाला | पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्‍या देशद्रोहींवर कठोर कारवाई करा | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पुणे शहर भाजप ने दिले निवेदन
PMC Ward Committee Chairman Election | दोन प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदासाठी होणार निवडणूक | १३ प्रभाग समितीचे अध्यक्ष होणार बिनविरोध
PMC Retired Employees | फेब्रुवारी महिन्यात पुणे महापालिकेचे 39 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त

PMPML Employees Promotion | पीएमपी कर्मचारी पदोन्नती प्रकरण | चौकशी समितीत पीएमपी अधिकारी नको |शिवसेना शहर प्रमुख यांच्यासह  माजी नगरसेवकांची मागणी

 

PMP Pune – (The Karbhari News Service) – पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड खात्यामधील ठराविक कामगारांना पात्रता नसताना दिलेल्या पदोन्नती बाबत काही तक्रारी प्राप्त झाली आहे. त्यामुळे पीएमपी ची जनमानसात प्रतिमा मलीन झाली आहे. असा ठपका ठेवत पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त तथा पीएमपी सीएमडी पृथ्वीराज बी पी यांनी या पदोन्नती ची चौकशी लावली आहे. तसेच यासाठी पीएमपी आणि महापालिका अधिकाऱ्यांची समिती गठीत केली आहे. मात्र या समितीतून पीएमपी च्या अधिकाऱ्यांना घेऊ नये, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे आणि माजी नगरसेवक उज्वल केसकर यांनी केली आहे. (Pune Breaking News)

पीएमपी सीएमडी यांनी या तिघांची समिती गठीत केली आहे.

१ अॅलिस पोरे – सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
२ विजय थोरात – उपायुक्त, सामान्य प्रशासन, पुणे महानगरपालिका
3 सुरेश खेडकर – मुख्य अंतर्गत लेखापरीक्षक, पीएमपी

यातील दोन अधिकारी हे पीएमपी प्रशासनातील आहेत. या अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवत त्यांना समितीतून काढण्याची मागणी करण्यात आली आहे.


पीएमपी सीएमडी यांनी पदोन्नती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी  तिघांची समिती गठीत केली आहे. यात दोन अधिकारी हे पीएमपी मधील आहेत. आमची मागणी आहे कि या दोघांच्या जागेवर महापालिका आणि इतर सरकारी खात्यातील चांगल्या दर्जाचे अधिकारी घेऊन ही चौकशी केली जावी.

-| प्रमोद भानगिरे, शहर प्रमुख, शिवसेना.

—–

ऍलिस पोरे आणि सुरेश खेडकर याने यापूर्वी या पदोन्नतीत आणि प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्यामुळे ते निपक्षपातीपणे काम करतील असे वाटत नाही. या दोन व्यक्तीने स्वतःहून या समितीतून बाहेर पडावे अथवा अतिरिक्त आयुक्त यांनी या समितीतून दोघांच्या जागी इतर अधिकाऱ्यांची नेमणूक करावी तरच न्याय होईल, असे आम्हाला वाटते.

| उज्वल केसकर, माजी नगरसेवक 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: