Self Enumeration | पुण्यातील खासदार, आमदार, नगरसेवक, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नागरिकांना स्व-गणना करण्याचे आवाहन

HomeBreaking News

Self Enumeration | पुण्यातील खासदार, आमदार, नगरसेवक, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नागरिकांना स्व-गणना करण्याचे आवाहन

Ganesh Kumar Mule May 02, 2026 8:19 AM

Pending First Installment | गौरी गणपती येण्या अगोदर मनपा कर्मचाऱ्यांना पहिल्या हफ्त्याची रक्कम मिळणार का?
Shivsena Pune | पुण्यातील पुरामुळे नुकसानग्रस्त कुटुंबांना शिवसेनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
PT 3 Form | Pune Property Tax | PT-3 अर्ज भरून देण्याची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत | पुणेकरांना दिलासा

Self Enumeration | पुण्यातील खासदार, आमदार, नगरसेवक, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नागरिकांना स्व-गणना करण्याचे आवाहन

 

Pune News – (The Karbhari News Service) – भारताची जनगणना २०२७ पहिली फेरी घर यादी व घराची गणना  self enumeration  १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत होणार असून  १ मे  रोजी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून se.census.gov.in या पोर्टलला भेट देऊन स्वगणणेची प्रक्रिया पूर्ण केली. (Pune Breaking News)

यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री सहकार आणि नागरी विमान वाहतूक  मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री नगर विकास परिवहन सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ महाराष्ट्र राज्य,  माधुरीताई मिसाळ,  आमदार  सिद्धार्थ शिरोळे,  हेमंत रासने,  योगेश टिळेकर , पुणे महानगरपालिके च्या महापौर मंजुषा दीपक नागपुरे, स्थायी समिती अध्यक्ष  श्रीनाथ भिमाले तसेच पुणे महानगरपालिकेच्या विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्य, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष)  ओमप्रकाश दिवटे आणि  अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल)  पवनीत कौर यांनी देखील जनगणनेच्या या विशेष मोहिमेत सहभाग घेऊन स्वतःची स्व-गणना करून पुणे शहरातील नागरिकांना स्व- गणना करण्याचे या प्रसंगी आवाहन केले.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: