PMC Women Employees | पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी महाभोंडल्याचे पी एम सी एम्प्लॉईज युनियन तर्फे आयोजन
PMC Employees Union – (The Karbhari News Service) – भोंडला हा एक महाराष्ट्रातील स्त्रियांचा उत्सव आहे. हा सण महिलांसाठी विशेष आवडीचा आहे. नवरात्रीचे नऊ दिवस ते दसऱ्याच्या दिवसापर्यंत हा खेळ खेळला जातो. या दृष्टीने या सणाला आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी पीएमसी एम्प्लॉइज यांच्या वतीने मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकारी व कर्मचारीं यांचेकरिता “महाभोंडल्याचे” आयोजन करण्यात आले होते. (Pune Municipal Corporation – PMC)
अति आयुक्त (ज) व मा. मुख्य कामगार अधिकारी तसेच पीएमसी इम्प्लॉईज युनियनचे आद्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारत येथील हिरवळीवर पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकारी व कर्मचारी तसेच क्षेत्रीय कार्यालयाकडील महिला सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या व पारंपरिक पद्धतीने फेर धरून भोंडल्याची गाणी गात उत्साहाने कार्यक्रम पार पडला. मनपाच्या सर्व महिलांना पीएमसी एम्प्लॉइज युनियनच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले. यामध्ये सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन पीएमसी एम्प्लॉइजच्या कार्याध्यक्ष पूजा देशमुख, महिला कार्याध्यक्ष पल्लवी कुलथे, महिला उपाध्यक्ष छाया सूर्यवंशी, अमृता इंगवले, संगीता बांगर, अनुराधा जगताप, शशी निरवणे, श्रीमती दीपावली गायकवाड, वंदना पाटसकर, वैशाली भोईर तसेच उर्मिला फडतरे व योगिता जायभाय व इतर सहकाऱ्यांनी केले.
तसेच सर्व महिला वर्गाने प्रशासनाचे महा भोंडल्यासाठी दिलेल्या परवानगीसाठी आभार मानले.
COMMENTS