महापालिका पाणी वापर करणार कमी!
: कालवा समितीतील ताशेऱ्याबाबत महापालिका गंभीर
: कपातीबाबत नियोजन करण्याचे सर्व झोन ला निर्देश
पुणे: पुणे महापालिका मंजूर कोट्यापेक्षा जास्त वापर करते, अशा पद्धतीची टिप्पणी जलसंपदा विभागाकडून वारंवार करण्यात येते. याबाबत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत देखील सातत्याने ताशेरे ओढले जातात. शिवाय याअगोदर बऱ्याच राजकीय नेत्यांनी पुण्याच्या जास्त पाणी वापराबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा कालवा समितीचे अध्यक्ष अजित पवार यांनी महापालिकेला पाणी वापर कमी करण्याबाबत सूचना केल्या आहेत. ही बाब आता पुणे महापालिकेने खूप गंभीरतेने घेतली आहे. त्यानुसार पुढील काळात महापालिका पाणी वापर कमी करणार आहे. पाणी कपातीबाबत सर्व झोननी तात्काळ नियोजन करण्याचे निर्देश महापालिका पाणीपुरवठा मुख्य अभियंत्यांनी नुकतेच दिले आहेत. त्यामुळे पुणेकरांना आता पाणी कपातीची तयारी ठेवावी लागणार आहे.
2005 पासून पाण्याचा कोटा वाढलेला नाही
पुणे महानगरपालिका पुणे शहराला तसेच 5 किमीच्या परिघात येणाऱ्या गावांना पाणीपुरवठा करते. यासाठी महापालिका खडकवासला प्रकल्पाच्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर अशा 4 जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जातो. या 4 धरणांमधून 11.50 टीएमसी पाणी पालिकेने मंजूर केले आहे. गेल्या वर्षापासून भामासखेड धरणातून 2.64 टीएमसी पाणी मिळत आहे. तसेच पवना धरणातून 0.34 टीएमसी पाणी मिळत आहे. सध्या असे एकूण 14.48 टीएमसी पाणी मिळत आहे. परंतु प्रत्यक्षात पुण्याची गरज 18.58 टीएमसी पाण्याची आहे. तसेच, राज्य सरकारच्या सूचनेनुसार नुकतीच 34 गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या गावांची लोकसंख्या 10 लाखांपर्यंत आहे. त्यामुळे त्याचा भार पालिकेवर पडणार आहे. म्हणूनच पालिकेला अतिरिक्त पाण्याची गरज आहे. खडकवासला प्रकल्पातून शहराला तसेच जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो. सन 2005 मध्ये सरकारच्या उच्चस्तरीय समितीने खडकवासला प्रकल्पातून शहरासाठी 11.50 टीएमसी पाण्याचा कोटा मंजूर केला होता. तेव्हापासून शहराला तेवढेच पाणी मिळत आहे. शहराची लोकसंख्या वाढत असताना महापालिका हद्दीत गावांचाही समावेश करण्यात येत आहे. यामुळे पालिकेकडून अतिरिक्त पाण्याची मागणी सातत्याने होत होती. पण पाण्याचा कोटा वाढवण्यात आलेला नाही.
कालवा समितीत ओढले जातात ताशेरे
असे असले तरी मात्र पुणे महापालिका मंजूर कोट्यापेक्षा जास्त वापर करते, अशा पद्धतीची टिप्पणी जलसंपदा विभागाकडून वारंवार करण्यात येते. याबाबत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत देखील सातत्याने ताशेरे ओढले जातात. शिवाय याअगोदर बऱ्याच राजकीय नेत्यांनी पुण्याच्या जास्त पाणी वापराबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा कालवा समितीचे अध्यक्ष अजित पवार यांनी महापालिकेला पाणी वापर कमी करण्याबाबत सूचना केल्या आहेत. ही बाब आता पुणे महापालिकेने खूप गंभीरतेने घेतली आहे. त्यामुळे सर्व झोनने शक्य तेवढे पाण्याचा वापर कमी करणेबाबत प्रयत्न करावेत. खास करुन स्वारगेट विभाग व एसएनडीटी विभागाने पाण्याचे कपातीबाबत प्रयत्न करणे शक्य आहे. पाणी कपातीच्या अनुषंगाने पंपिंग विभागाकडील अभियंत्यांबरोबर सर्व झोनने लागलीच एकत्रित बैठक घेऊन, पाणी कपातीबाबत निर्णय करावा. असे आदेश पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रशासन तयारीस लागले आहे.
COMMENTS