Katraj Kondhwa Road | कात्रज–कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला गती : उच्चस्तरीय समितीच्या बैठकी मध्ये अंतिम निवाडा प्रस्तावास मान्यता, पहिला टप्प्याचा ५० मीटर रुंदीचा रस्ता करण्याचा मार्ग मोकळा

Homeadministrative

Katraj Kondhwa Road | कात्रज–कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला गती : उच्चस्तरीय समितीच्या बैठकी मध्ये अंतिम निवाडा प्रस्तावास मान्यता, पहिला टप्प्याचा ५० मीटर रुंदीचा रस्ता करण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Kumar Mule Apr 13, 2026 7:53 PM

Gas Cylinder Delivery by OTP | गॅस सिलेंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच होणार | ९६ तासांत होणार घरपोच – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Jitendra Dudi IAS | जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांची बदली | पुण्याला मिळाले नवीन जिल्हाधिकारी
Aashadhi Wari Palkhi Sohala | वारकऱ्यांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी | आगामी आषाढी वारीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न

Katraj Kondhwa Road | कात्रज–कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला गती : उच्चस्तरीय समितीच्या बैठकी मध्ये अंतिम निवाडा प्रस्तावास मान्यता

| पहिला टप्प्याचा ५० मीटर रुंदीचा रस्ता करण्याचा मार्ग मोकळा

 

Pune Breaking News – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक असलेल्या कात्रज–कोंढवा रस्त्याचे वाढते वाहतूक महत्त्व लक्षात घेऊन प्रस्तावित ८४ मीटर रुंदीच्या विकास आराखड्यातील (DP) रस्त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा रस्ता करण्यासाठी भू-संपादन महापालिका प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखालील भू-संपादन विभागामार्फत तयार करून विभागीय आयुक्त यांच्यामार्फत शासनास सादर केला आहे. (Pune PMC News)

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाधिकारी  जितेंद्र डुडी यांचे पाठपुराव्यामुळे आज अतिरिक्त मुख्य सचिव महसूल व वने यांचे अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीची बैठक आज सकाळी मंत्रालयात पार पडली. त्या बैठकी मध्ये सदर अंतिम निवाडा प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून, भूसंपादन निवाडा घोषित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या सुमारे १० वर्षापासून भूसंपादन साठी रखडलेला रस्ता प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. शासन मान्यता आदेश निर्गमित होताच सदर रस्त्यासाठी प्रत्यक्ष ताबे घेण्याचे आणि तातडीने रस्ता करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सदर रस्ता झाल्यानंतर शहरातील दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटून सुरक्षित जड वाहतुकीस देखील चालना मिळणार आहे.

 

एकूण ३.५ किमी लांबीच्या रस्त्यासाठी हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १२९ मिळकतींमधील सुमारे ५२,६३० चौ.मी. क्षेत्राचे भू-संपादन केले जाणार आहे. ५० मीटर रुंदीच्या रस्त्याच्या कामामध्ये मुख्य रस्ता, दोन्ही बाजूंना सर्विस रस्ते, पावसाळी वाहिनी (U-ड्रेन), तसेच माऊली नगर येथे ग्रेड सेपरेटरचा समावेश आहे.

दरम्यान, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मार्फत उभारण्यात येणारा उड्डाणपूल राजस चौक येथे सुमारे २६० मीटरपर्यंत येत आहे. या उड्डाणपुलाच्या उतारासाठी विद्यमान वाहतूक वळविणे आवश्यक असल्याने सुमारे ४०० मीटर लांबीचे सर्विस रस्ते विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी काही भाग पूर्ण झाला असून उर्वरित काम सुरू आहे.NHAI मार्फत सदर सेवा रस्ता काम झाल्यावर पुलाच्या एप्रोच रोड चे रखडलेले काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

“कात्रज–कोंढवा रस्ता हा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. सदर रस्त्याची आवश्यक भूसंपादन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने गेली अनेक वर्षे सदर रस्ता प्रलंबित होता. पुणे शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा हा प्रकल्प गतिमानतेने पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तीशः लक्ष घालून प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने सूचना प्रशासनास दिल्या होत्या. या प्रकल्पासाठी भू-संपादन प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी पुणे महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून पहिल्या टप्प्यातील ५० मीटर रुंदीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेमार्फत महाराष्ट्र शासनाकडे पाठविलेला भूसंपादन प्रस्तावास आज उच्चस्तरीय समितीद्वारे मान्यता मिळाली आहे ”

नवल किशोर राम, महानगरपालिका आयुक्त.


 

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाढती वाहतूक आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळत असून आता या रस्तारुंदीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळत आहे, याचा मला आनंद आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्यात येणार असून, मुख्य रस्ता, सेवा रस्ते, पावसाळी वाहिनी तसेच माऊलीनगर येथे ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. एकूण ३.५ किमी लांबीच्या या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असून, या कामामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सन २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यामुळे कात्रज-कोंढवा परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा मिळेल. या कामासाठी महापालिका व जिल्हा प्रशासन समन्वयाने कार्य करत असून, हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी माझा पाठपुरावा कायम राहील.

| योगेश टिळेकर, आमदार. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: