PMC Ward Office Stregnthening | क्षेत्रीय कार्यालये अधिक बळकट करण्याच्या प्रस्तावाला मान्यता | क्षेत्रीय अधिकारी, परिमंडळ उपायुक्त यांना महापालिका आयुक्तांनी दिले हे अधिकार!
| अधिकार असताना आता प्रकरण वरिष्ठांना पाठवले तर होणार कारवाई
Naval Kishore Ram IAS – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आता क्षेत्रिय कार्यालय स्तरावर बळकटी आणण्याचा निर्धार केला आहे. शहराची वाढती लोकसंख्या पाहता क्षेत्रिय कार्यालयांवर कामाचा ताण येत आहे या करीता समिती स्थापन करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ८ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली होती. ही समिती बृहन्मुंबई महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचा अभ्यास करून पुणे मनपाची क्षेत्रीय कार्यालये बळकट करण्याबाबत अहवाल देणार होती. त्यानुसार आता क्षेत्रीय कार्यालये आता अधिक बळकट करण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळ उपायुक्त यांच्या अधिकारात वाढ केली आहे. त्यासाठी एक धोरण बनवले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे शहराच्या कार्यक्षेत्राचा विचार करता व पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमुळे पुणे महानगरपालिकेला विकास कामे व सदर ठिकाणी सुविधा पुरवणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत पुणे महानगरपालिकेचे ५०२ चौरस किलोमीटर कार्यक्षेत्र आहे. तसेच पुणे शहराची वाढती लोकसंख्येचा विचार करता सदर ठिकाणी सोयी सुविधा पुरविणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे क्षेत्रिय कार्यालयांवर कामाचा ताण येत आहे. पुणे महानगरपालिकेचे विविध क्षेत्रिय कार्यालये बळकटीकरण करून तेथील समस्याचा निवारण करून व प्राप्त होणाऱ्या तक्रारी ह्या क्षेत्रिय स्तरावर सोडविण्याच्या दृष्टीने व तक्रारी कमी करण्यास उपाय योजना आखण्याकरिता समिती स्थापन करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आदेश दिले होते कि, या समितीने बृहन्मुंबई महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचा अभ्यास करून कशा प्रकारे आपली क्षेत्रीय कार्यालये बळकट होतील, याचा अभ्यास करायचा आहे, तसेच नागरिकांना समाधानकारक सोयीसुविधा आणि त्या परिसरात विकास काम करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याचा अभ्यास करायचा आहे. तसेच याचा अहवाल १५ दिवसात सादर करायचा आहे. त्यानुसार आता क्षेत्रीय अधिकारी आणि परिमंडळ उपायुक्त यांच्या अधिकारा बाबत नियमावली लागू केली आहे.
महापालिका आयुक्तांनी दिला हा इशारा
त्यानुसार क्षेत्रिय कार्यालयाचे कामकाज शिघ्रतेने व कार्यक्षमपणे पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व परिमंडळ उपयुक्त / सहाय्यक आयुक्त यांना प्रशासकीय/ वित्तीय स्वरुपाचे अधिकार प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी ज्या प्राधिका-यांना पअधिकार प्रदान केले असतोल असं अधिकार निरस्त करण्यात आले आहेत.
अधिकार प्रदान करण्यात आलेल्या अधिका-यांनी प्रदान करण्यात आलेले अधिकार पूर्ण क्षमतेने वरिष्ठांच्या हस्तक्षेपाशिवाय, निःपक्षपातीपणे वापरावेत. प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर न करणे, अधिकार प्रदान करण्यात आलेले असताना निर्णय घेण्याकरिता प्रकरणे वरिष्ठांकडे सादर करणे हे कर्तव्यपालनातील दुर्लक्ष समजण्यात येईल व वरिष्ठ अधिका-यांकडून सदर कमुरीबद्दल संबंधित अधिका- यांच्या गोपनिय अहवालात नोंद घेण्यात येईल. असा इशारा देखील महापालिका आयुक्त यांनी दिला आहे.
: वित्तीय अधिकार व प्रशासकीय अधिकार
१. खातेप्रमुख/उपआयुक्त/परिमंडळ तांत्रिक प्रशासकीय – प्रशासकीय मान्यता – ५ ते २५ लाख – निविदा मान्यता – ५ ते २५ लाख
२. महापालिका सहाय्यक आयुक्त – प्रशासकीय आणि निविदा मान्यता – १ लक्ष ते ५ लक्ष
३. कार्यकारी अभियंता – तांत्रिक मान्यता – १० लक्ष ते २५लक्ष
४. उप अभियंता – तांत्रिक मान्यता – १० लक्ष पर्यंत – प्रशासकीय आणि निविदा मान्यता – १ लक्ष पर्यंत
२५ लक्ष वरील निविदा मान्यतेसाठी महापालिका आयुक्त व अति. महापालिका आयुक्त (ज/वि/इ) यांचे मार्फत स्थायी समितीकडे सादर होईल.
——
खालील नमूद कामांसाठी प्रत्येकी २५ लक्षच्या मर्यादेमध्ये आयुक्त यांच्याकडील अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.
१. बांधकाम विभाग / पथ / मल:निसारण / विद्युत / भवन विभाग
१. उप आयुक्त परिमंडळ – अधिकाराचे स्वरूप – १२ मीटर पर्यंत रुंदी असलेली सर्व रस्तांची भांडवली कामे करणे. आणि १२ मीटर पेक्षा जास्त रुंदी असलेल्या रस्तांची
देखभाल दुरुस्ती विषयक सर्व कामे –
प्रचलित कार्यपद्धती – मुख्य अभियंता पथ विभाग यांच्या मान्यतेने अधीक्षक / कार्यकारी अभियंता
प्रस्तावित कार्यपद्धती – उप आयुक्त परिमंडळ यांच्या मान्यतेने सहाय्यक आयुक्त
२. उप आयुक्त परिमंडळ – अधिकाराचे स्वरूप – ६०० मीपर्यंत व्यासाच्या सर्व मल:निसारण /पावसाळी लाइनची भांडवली कामे. Trunk Lines वगळून इतर सर्व मलनिसारण व पावसाळी लाइनची देखभाल दुरुस्तीची कामे करणे. सर्व नाले सफाई / नाले खोलीकरण रुंदीकरण करणे.
प्रचलित कार्यपद्धती – मुख्य अभियंता मल:निसारण /पथ यांच्या मान्यतेने अधीक्षक / कार्यकारी अभियंता
प्रस्तावित कार्यपद्धती – उप आयुक्त परिमंडळ यांच्या मान्यतेने सहाय्यक आयुक्त
अधिकाराचे स्वरूप – विकासक, आस्थापना यांना ड्रेनेज एनओसी देणे. प्रचलित कार्यपद्धती – कार्यकारी अभियंता यांच्या मान्यतेने उप अभियंता – प्रस्तावित कार्यपद्धती – उप आयुक्त परिमंडळ यांच्या मान्यतेने सहाय्यक आयुक्त व कार्यकारी अभियंता यांच्या संयुक्त मान्यतेने
३. उप आयुक्त परिमंडळ – अधिकाराचे स्वरूप – उद्यान विभागाकडील दुभाजक आणि रस्त्यालगतचे ग्रीन पॅसेज (सर्व उद्याने वगळून) देखभाल व दुरुस्ती विषयक कामे करणे.
प्रचलित कार्यपद्धती – मुख्य उद्यान अधीक्षक यांच्या मान्यतेने कार्यकारी अभियंता
प्रस्तावित कार्यपद्धती – उप आयुक्त परिमंडळ यांच्या मान्यतेने सहाय्यक आयुक्त
४. उप आयुक्त परिमंडळ – भवन रचना विभागाकडील स्मशानभूमी म.न.पा इमारती, CTPT. म.न.पा. शाळा मधील देखभाल दुरुस्ती विषयक सर्व कामे
प्रचलित कार्यपद्धती – अधीक्षक अभियंता यांच्या मान्यतेने कार्यकारी अभियंता
प्रस्तावित कार्यपद्धती – उप आयुक्त परिमंडळ यांच्या मान्यतेने सहाय्यक आयुक्त
५. उप आयुक्त परिमंडळ – विद्युत विभाग अंतर्गत २५ लाख पर्यंत देखभाल दुरुस्ती विषयक कामे करणे.
प्रचलित कार्यपद्धती – मुख्य अभियंता विद्युत मान्यतेने कार्यकारी अभियंता
प्रस्तावित कार्यपद्धती – उप आयुक्त परिमंडळ यांच्या मान्यतेने सहाय्यक आयुक्त
२. आकाशचिन्ह विभाग
उप आयुक्त परिमंडळ – अधिकाराचे स्वरूप – आकाशचिन्हसाठी परवाना देणे, परवानगी व नामफलकाची मान्यता देणे, अनधिकृत फलकांवर कार्यवाही जाहिरात फलक, होर्डिंग मान्यता देणे, साठा परवाना व मशनरी परमिट देणे.
प्रचलित कार्यपद्धती – अतिरिक्त महापलिका आयुक्त यांच्या मान्यतेने उप आयुक्त
प्रस्तावित कार्यपद्धती – उप आयुक्त परिमंडळ यांच्या मान्यतेने सहाय्यक आयुक्त
३. आरोग्य विभाग –
उप आयुक्त परिमंडळ – अधिकाराचे स्वरूप – क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांनी पाळीव प्राणी परवाना, ब्युटी पार्लर/ स्पा परवाना/ लोजिंग आणि बोर्डिंग परवाना. मंगल कार्यालय परवाना देणे.
प्रचलित कार्यपद्धती – आरोग्य प्रमुख यांच्या मान्यतेने उप / सहाय्यक आरोग्य प्रमुख
प्रस्तावित कार्यपद्धती – उप आयुक्त परिमंडळ यांच्या मान्यतेने सहाय्यक आयुक्त/ वार्ड मेडिकल ऑफिसर यांचे संयुक्त स्वाक्षरीने.
टीप – PCPNDT विषयक सर्व बाबी व नर्सिंग ऍक्ट मधील मान्यता व हॉस्पिटल मान्यता यापूर्वी प्रमाणे आरोग्य विभागाकडे राहतील.
४. कर आकारणी व कर संकलन विभाग
उप आयुक्त परिमंडळ – अधिकाराचे स्वरूप – कर आकारणी व कर संकलन विभागात मालमत्ता धारकाच्या नावात बदल, मालमत्ता हस्तांतरण प्रशासकीय स्तरावर करणे. कर वसुलीबाबत नियंत्रण व पाठपुरावा करणे.
प्रचलित कार्यपद्धती – उप आयुक्त कर आकारणी व कर संकलन विभाग
प्रस्तावित कार्यपद्धती – उप आयुक्त परिमंडळ यांच्या मान्यतेने सहाय्यक आयुक्त
५. अतिक्रमण विभाग – अतिक्रमण विभाग व आकाशचिन्ह विभागाकडील कारवाईसाठी सर्व सहाय्यक आयुक्त यांना नोडेल ऑफीसर म्हणून आदेशित करण्यात येत आहे. मुख्य कार्यालयाकडून कारवाईसाठी लागणारे • मनुष्यबळ, , मशिनरी पुरविणे व सयुक्त कारवाई प्रस्तावित करण्याची जबाबदारी उपयुक्त अतिक्रमण व आकाशचिन्ह विभागायांची राहील.
६. मोटर वाहन विभाग – मोटर वाहन विभागाकडील जेटींग मशीन, ग्राब मशीन, टायगर मशीन, वृक्ष फांदे छाटणी वाहने व फांद्या वाहून नेणारी वाहने यांचे वाटप मोटर वाहन विभागाने सहाय्यक आयुक्त यांना वार्ड निहाय करणेचे आहे.

COMMENTS