International RTI Day | भारतात सर्वप्रथम माहिती अधिकाराचा अर्ज दाखल करणाऱ्या डॉ. शाहिद रजा बर्नी यांचा पुणे महापालिकेने केला सन्मान!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या वतीने 28 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून माहिती अधिकार अधिनियमाचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी कार्य करणारे व अनेक सुधारणा करणारे ज्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत दिनांक 12 ऑक्टोबर 2005 रोजी भारतामध्ये सर्वप्रथम माहिती अधिकाराचा अर्ज दाखल केला असे थोर व्यक्तिमत्व डॉ. शाहिद रजा बर्नी यांचा शॉल व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. अशी माहिती महापालिका मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी दिली. (PMC Labour Welfare Department)
पुणे महानगरपालिकेतील सर्व जन माहिती अधिकारी यांचे करिता प्रशिक्षण प्रबोधिनीच्या वतीने माहिती अधिकार अधिनियम कलम ४ (ख) मधील १ ते १७ मुद्द्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन अब्राहम आढाव, माहिती अधिकार अभ्यासक व प्रसारक यांचेमार्फत देण्यात आले.

तसेच पुणे महानगरपालिकेचे माहिती अधिकार नोडल अधिकारी तथा मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती देताना, अपील घेताना कोणकोणत्या बाबींवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले व अधिकारी कर्मचारी यांच्या शंकांचे निरसन केल. तदनंतर सर्व जन माहिती अधिकारी यांचे साठी प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये प्रश्न विचारण्यात येऊन बरोबर उत्तर दिलेल्या अधिकाऱ्यांना छोटीशी भेटवस्तू देण्यात आली.
आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या दालनामध्ये सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी सुंदर रंगवली काढण्यात आली. त्याच बरोबर पुणे महानगरपालिकेच्या मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्व नागरिकांना आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाच्या शुभेच्छा प्रसारित करण्यात आल्या. पुणे महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करणे बाबत कार्यालय परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले. त्यानुसार विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

COMMENTS