PMC Ward 21 – Mukundnagar Salisbury Park – प्रभाग क्रमांक – २१ – मुकुंदनगर सॅलसबरी पार्क | प्रभागाची व्याप्ती आणि रचना जाणून घेऊयात सविस्तर

Homeadministrative

PMC Ward 21 – Mukundnagar Salisbury Park – प्रभाग क्रमांक – २१ – मुकुंदनगर सॅलसबरी पार्क | प्रभागाची व्याप्ती आणि रचना जाणून घेऊयात सविस्तर

Ganesh Kumar Mule Sep 04, 2025 9:56 PM

PMC Ward 9 – Sus Baner Pashan | प्रभाग क्रमांक – ९ –  सुस- बाणेर – पाषाण | बालेवाडी गावठाण ते लमाण वस्ती पर्यंत पसरलेल्या या प्रभागा विषयी सविस्तर जाणून घ्या 
Pune PMC Election 2025 | ४१ प्रभाग तर १६५ नगरसेवक! | पुणे महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर 
Omprakash Divate PMC | राजकीय पक्षांचे प्रतिनिधींकडून प्रभाग रचनेसंबंधी दिशाभूल | अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन  

PMC Ward 21 – Mukundnagar Salisbury Park – प्रभाग क्रमांक – २१ – मुकुंदनगर सॅलसबरी पार्क | प्रभागाची व्याप्ती आणि रचना जाणून घेऊयात सविस्तर

 

PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – प्रभाग क्रमांक – २१ अर्थात  मुकुंदनगर सॅलसबरी पार्क मध्ये   छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, प्रेमनगर झोपडपट्टी, आंबेडकर झोपडपट्टी  असे परिसर येत आहेत. या प्रभागाची हद्द, रचना सविस्तर जाणून घेऊयात. (Pune Municipal Corporation – PMC)

 

प्रभाग क्रमांक – २१ – मुकुंदनगर सॅलसबरी पार्क

लोकसंख्या एकूण ८००८२ – अ. जा. १२९५५ – अ.ज. ८५१

निवडुन द्यायच्या सदस्यांची संख्या  – ४

व्याप्ती: मुकुंदनगर, टी. एम. व्ही. कॉलनी, सॅलीसबरी पार्क, लुल्लानगर, हाईड पार्क, पारसी कॉलनी, फकरी हिल्स, शिवनेरी नगर (भाग). गुलटेकडी इंदिरानगर, आदीनाथ सोसायटी डीएसके चंद्रदीप, सुजय गार्डन, कटारिया हायस्कूल, छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, प्रेमनगर झोपडपट्टी, आंबेडकर झोपडपट्टी, इ.

उत्तर: पुणे सातारा रस्ता केशवराव जेधे चौकात जेथे नाना शंकरशेठ रस्त्यास मिळतो, तेथून पूर्वेस नाना शंकरशेठ रस्त्याने सेव्हन लव्हज चौकात पं. जवाहरलाल नेहरू रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस पं. जवाहरलाल नेहरू रस्त्याने इरावती कर्वे रस्त्यास मिळेपर्यंत. तेथून पूर्वेस इरावती कर्वे रस्त्याने पुणे कॅन्टोन्मेंटच्या हदीस मिळेपर्यंत. तेथून दक्षिणेस व पुढे पूर्वेस पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीने कोंढवा रस्त्यास साळुंकेविहार रस्त्याजवळ चौकाजवळ मिळेपर्यंत.

पुर्वः पुणे कॅन्टोन्मेंटची हद्द कोंढवा रस्त्यास साळुंकेविहार रस्त्याजवळ जेथे मिळते तेथून दक्षिणेस कोंढवा रस्त्याने ब्रम्हा इस्टेट सोसायटीच्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस व पुढे उत्तरेस सदर रस्त्याने शत्रुंजय प्लाझा इमारतीच्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर हद्दीने व हद्दीच्या सरळ रेषेने ब्रम्हा अवेन्यू सोसायटी सी ५ इमरतीच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस व पुढे दक्षिणेस ब्रम्हा अवेन्यू सोसायटीच्या पूर्वेकडील हद्दीने शिवगंगा हाईट्सच्या दक्षिणेकडील हद्दीवरील रस्त्यास मिळेपर्यंत.

दक्षिण: ब्रम्हा अवेन्यू सोसायटीची पूर्वेकडील हद्द शिवगंगा हाईट्सच्या दक्षिणेकडील हद्दीस जेथे मिळते, तेथून पश्चिमेस सदर हद्दीने शिवनेरी नगर लेन नं. २९ २८ २७ ओलांडून (अनन्य हाईट्सची दक्षिणेकडील हद्द व साई आंगणची उत्तरेकडील हद्द) लेन नं. ३० ला मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस शिवनेरी नगर लेन नं. ३० ने शिवनेरी नगर लेन नं. ३१ ला मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस शिवनेरी नगर लेन नं. ३१ ने डिफेन्सच्या हद्दीस (रायफल रेंजची पूर्वेकडील हद्द) मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रायफल रेंजच्या पूर्वेकडील डिफेन्स हद्दीने रायफल रेंजची दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस व पुढे उत्तरेस रायफल रेंजच्या पश्चिमेकडील हद्दीने DAD निवासी वसाहत बी विंग च्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पूर्वेस व पुढे उत्तरेस DAD निवासी वसाहत बी विंग च्या पूर्वेकडील हद्दीने बिबवेवाडी कोंढवा रस्त्यास (केशवराव सिताराम ठाकरे रस्ता) मिळेपर्यंत.

पश्चिमः DAD निवासी वसाहत बी विंग च्या पूर्वेकडील हद्द बिबवेवाडी कोंढवा रस्त्यास (केशवराव सिताराम ठाकरे रस्ता) जेथे मिळते तेथून पश्चिमेस बिबवेवाडी कोंढवा रस्त्याने गंगाधाम चौक ओलांडून वास्तुनगर सोसायटीच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने वास्तूनगर सोसायटीचा पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन या इमारतीच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर हद्दीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीच्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस व पुढे पश्चिमेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील हद्दीने कुमार सिद्धांचल सोसायटीच्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत. तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने अनिकेत सोसायटीच्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर हद्दीने व पुढे प्रेमनगर सोसायटीच्या पूर्वेकडील हद्दीने व पुढे उत्तरेस सूर्यप्रकाश सोसायटीच्या पूर्वेकडील रस्त्याने शिवनेरी रस्त्यास (मार्केट यार्ड रस्ता) मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस शिवनेरी रस्त्याने पुणे सातारा रस्त्यास उत्सव बिल्डींगजवळ मिळेपर्यंत. तेथून उत्तरेस पुणे सातारा रस्त्याने केशवराव जेधे चौकात नाना शंकर शेठ रस्त्यास मिळेपर्यंत.

 

The Karbhari - PMC Pune Election 2025

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: