PMC Ward 9 – Sus Baner Pashan | प्रभाग क्रमांक – ९ –  सुस- बाणेर – पाषाण | बालेवाडी गावठाण ते लमाण वस्ती पर्यंत पसरलेल्या या प्रभागा विषयी सविस्तर जाणून घ्या 

Homeadministrative

PMC Ward 9 – Sus Baner Pashan | प्रभाग क्रमांक – ९ –  सुस- बाणेर – पाषाण | बालेवाडी गावठाण ते लमाण वस्ती पर्यंत पसरलेल्या या प्रभागा विषयी सविस्तर जाणून घ्या 

Ganesh Kumar Mule Aug 29, 2025 9:11 PM

CM Devendra Fadnavis | राष्ट्रीय आमदार संमेलन क्षमता वृद्धींगत करण्याचे व्यासपीठ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
MHADA | Stamp Duty Amenity Scheme | म्हाडाच्या इमारत पुनर्विकासातील अडथळे हटणार | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार
7th Pay commission DA Hike | केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली   | त्यांच्या महागाई भत्त्यात किती वाढ होणार, हे आता निश्चित 

PMC Ward 9 – Sus Baner Pashan | प्रभाग क्रमांक – ९ –  सुस- बाणेर – पाषाण | बालेवाडी गावठाण ते लमाण वस्ती पर्यंत पसरलेल्या या प्रभागा विषयी सविस्तर जाणून घ्या

 

PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – प्रभाग क्रमांक – ९ – सुस- बाणेर -पाषाण-  ची व्याप्ती ही बालेवाडी गावठाण ते लमाण वस्ती पर्यंत अशी आहे. समाविष्ट गावातील बरेचसे भाग या प्रभागात मोडतात. या प्रभाग विषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. (Pune Corporation Election 2025)

 

प्रभाग क्रमांक – ९ –  सुस- बाणेर -पाषाण

लोकसंख्या – एकूण – ९०९०३ – अ. जा. १०३६७ – अ. ज. २१५४

निवडून द्यायच्या सभासदांची संख्या  – ४

व्याप्ती: बालेवाडी गावठाण, बाणेर गांवठाण, पाषाण गावठाण, सुतारवाडी, सूस, म्हाळुंगे, एलिट एम्पायर सोसायटी, नंदन प्रॉस्पेरा, ए. आर. डी.ई. भारत इलेक्ट्रॉनिक्स, पाषाण तलाव, सोमश्वर वाडी, संजय गांधी नगर, विधाते मुरकुटे वस्ती (भाग), समर्थ कॉलनी, वीरभद्र नगर, वसंत विहार, लक्ष्मण नगर, राम नगर, पारखे वस्ती, विद्या वॅली स्कूल, विंडोज सोसायटी, सुखवानी ग्रेसिया, शितलादेवी नगर, बेलाकासा सोसायटी, विस्परिंग विंड सोसायटी लमाण वस्ती इ.

उत्तर: मौजे नांदे व मौजे म्हाळुंगे यांची सामायिक हद्द (पुणे मनपा हद्द) मुळानदीस जेथे मिळते तेथून पूर्वेस व पुढे दक्षिणेस व पुन्हा पूर्वेस मुळा नदीने राम नदीस मिळेपर्यंत.

पुर्वः राम नदी मुळा नदीस जेथे मिळते तेथून दक्षिणेस राम नदीने औंध- सानेवाडी मधून येणाऱ्या नाल्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर नाल्याने पूलावर एस. एस. कम्युनिकेशन या दुकानाजवळील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने ज्ञानेश्वर (माऊली) मुकुंदराव मुरकुटे पथास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील औंध बाणेर हद्दीवरील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ओलांडून पुढे सदर रस्त्याने सिझन हॉटेल लगतच्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने औंध बाणेर हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर हद्दीने बाणेर रस्ता ओलांडून पुढे दक्षिणेस इंडियन इस्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च संस्थेच्या पश्चिमेकडील हद्दीने डॉ. होमी भाभा रस्त्यास (पाषाण रस्त्यास) मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस डॉ. होमी भाभा रस्त्याने ए. आर. डी. ई. च्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर हद्दीने मौजे कोथरूड, मौजे पाषाण आणि मौजे एरंडवणा यांच्या सामाईक हद्दीस मिळेपर्यंत.

 

दक्षिण: मौजे कोथरूड, मौजे पाषाण आणि मौजे एरंडवणा यांची सामाईक हद्द जेथे मिळते तेथून मौजे कोथरुड व मौजे पाषाणच्या सामाईक हद्दीने मौजे पाषाण, मौजे बावधन खुर्द यांचे हद्दीस मिळेपर्यंत, तेथून उत्तर पश्चिमेस मौजे पाषाण व मौजे बावधन खुर्द यांचे हद्दीने मौजे सुतारवाडी व मौजे बावधन बुद्रुक यांचे हद्दीस मिळेपर्यंत, व पुढे मौजे बावधन बु. व मौजे सुस यांच्या हद्दीने मौजे सुव मौजे लवळे यांच्या हद्दीस मिळेपर्यंत.

पश्चिमः सुस  व बावधन बु. यांची हद्द मौजे लवळेच्या हद्दीस (पुणे मनपा हद्द) जेथे मिळते तेथून उत्तरेस मौजे लवळे व मौजे सुसच्या हद्दीने व पुढे मौजे नांदे व मौजे सुस च्या हद्दीने व पुढे उत्तरेस मौजे म्हाळुंगे व मौजे नांदे यांच्या हद्दीने मुळा नदीस मिळेपर्यंत.

The Karbhari -Pune PMC Election 2025

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: