PMC Vs PCMC | पुणे महानगरपालिका क्रिकेट संघाची पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रिकेट संघावर मात
PCMC Anniversary – (The Karbhari News Service) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये पुणे महानगरपालिका क्रिकेट संघाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रिकेट संघावर अंतिम सामन्यात विजय प्राप्त करून विजेतेपद पटकविले. (Pune Municiapl Corporation – PMC)
पुणे मनपा क्रिकेट संघाने १० षटकात ४ बाद १०८ धावा केल्या. यात कपिल भापकर यांनी १६ चेंडूत ३३ धावा केल्या तर किरण शेवाळे यांनी १४ चेंडूत ३९ धावा केल्या. दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिका संघाला मात्र अवघ्या ७१ धावा करता आल्या. संघाने ८ विकेट गमावल्या आणि सामना देखील गमावला. यात पुणे महापालिकेच्या अतुल धोत्रे यांनी २ ओव्हर मध्ये ५ धावा देत ३ विकेट घेतल्या.


COMMENTS