PMC Traffic Planning Department | पुणे महापालिकेचा स्वतंत्र वाहतूक विभाग | महापालिका आयुक्तांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची केली नियुक्ती
Pune PMC News – (The Karbhari News Service) – केंद्र शासनाच्या नागरी वाहतूक धोरणाच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेसाठी (Pune Municipal Corporation – PMC) मंजूर आकृतीबंधानुसार वाहतूक नियोजन विभागाची (PMC Traffic Planning Department) स्वतंत्रपणे तरतूद करण्यात आली आहे. हा विभाग स्वतंत्रपणे कार्यान्वित करणेबाबत मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियुक्त केले आहे. (Pune Municipal Corporation)
वाहतून नियोजन विभागाच्या कामकाजाचे स्वरूप असे आहे
१. शहरातील वाहतुकीचे नियमांबाबत पोलीस विभागाशी समन्वय साधून सुसूत्रता निर्माण करणे, २४ मी व त्यावरील रुंदीच्या रस्त्यावरील पदपथ सायकल ट्रॅक, सब-वे, उड्डाणपूल ग्रेड सेपरेटर, मेट्रो, LRT, Metro Neo, HCMTR इ. कामांची अंमलबजावणी करणे.
२. PMRDA, PWD, Irrigation, MSEDCL, MSRDC, PMPML, MAHA METRO RAILWAY यांच्याशी समन्वय साधणे.
३. वाहतूक व्यवस्थेचे सुटसुटीत व सुरळीत नियोजन करणे व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकरिता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे, अनेक प्रकारच्या वाहतूक विषयक समस्यावर उपाययोजना करणे, त्या अनुषंगाने धोरण ठरवणे व अंमलबजावणी करून घेणे. वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या कामाची अंमलबजावणी करणे.
——–
पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी वाहतूक नियोजन विभागात खालील अधिकारी / सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.
१. मुख्य अभियंता – श्री. पावसकर अनिरुद्ध घनश्याम (अतिरिक्त पदभार)
२. अधिक्षक अभियंता –
३. कार्यकारी अभियंता – श्री. पाटील संदिप रघुनाथ
४. उप अभियंता – श्री. मापारी पवन पुरुषोत्तम
५. कनिष्ठ अभियंता -श्री. चौधरी सौरभ प्रमोद
६. कनिष्ठ अभियंता – श्रीमती देशमुख रश्मी योगेश
७.कनिष्ठ अभियंता – श्री. मेंढे प्रज्वल दिपक
८.कनिष्ठ अभियंता – श्री. गिरासे विरपाल नरेंद्रकुमार
ट्रान्सपोर्ट प्लॅनर – श्री. मिजार निखिल उमाकांत
(करार पद्धतीने)
COMMENTS