Dr Rajendra Bhosale IAS | पुणेकर नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी महापालिका तयार करणार धोरण!

HomeपुणेBreaking News

Dr Rajendra Bhosale IAS | पुणेकर नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी महापालिका तयार करणार धोरण!

गणेश मुळे Apr 10, 2024 2:41 PM

GB Syndrome in Pune | GBS च्या प्रकरणांवर त्वरित मोफत उपचार व जलप्रदूषण रोखण्याची काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मागणी
Independence Day | पुणे महानगरपालिकेत भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
Pune PMC News | नगरसचिव आणि क्रीडा अधिकारी पदावर नेमणुकी बाबतचे महापालिका आयुक्त यांचे आदेश जारी 

Dr Rajendra Bhosale IAS | पुणेकर नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी महापालिका तयार करणार धोरण!

| महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचा नागरिक केंद्रित प्रशासनावर भर

Dr Rajendra Bhosale IAS – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील वेगवेगळ्या भागांतून तसेच समाविष्ट गावांतून नागरिक विविध समस्या घेऊन महापालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) येत असतात. मात्र कधी कधी नागरिकांना महापालिका आणि क्षेत्रीय कार्यालयात नुसत्याच चकरा माराव्या लागतात. आगामी काळात याच गोष्टी टाळण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. नागरिक केंद्रित प्रशासनावर भर देत नागरिकांच्या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी  एक धोरण करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी दिली. (Pune PMC News)

| मूलभूत सुविधा देताना महापालिकेची दमछाक

पुणे महापकिकेत 34 समाविष्ट गावांचा समावेश झाला आहे. या गावांमध्ये मूलभूत समस्यांचा अभाव आहे. गावे आणि मूळ शहराला सुविधा पुरविताना महापालिकेची दमछाक होत आहे. अशातच आपल्या विविध समस्या घेऊन नागरिक महापालिकेत आयुक्तांना तसेच क्षेत्रीय कार्यालयात भेटण्यासाठी येतात. मात्र बऱ्याच वेळा नागरिकांच्या प्रश्नाचे निराकारण होत नाही. नागरिकांना फक्त चकरा माराव्या लागतात. याबाबत महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी गंभीरपणे लक्ष दिले आहे. (Pune Municipal Corporation Latest News)

| सर्व खातेप्रमुखानी सोमवारी आणि गुरुवारी आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य

प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी व गुरुवारी सकाळी १०.३० ते १२.३० वा. नागरिक त्यांच्या समस्येबाबत  महापालिका आयुक्त यांचे भेटीस येत असतात. या वेळेत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण शक्यतो जागेवरच करणे व त्या अनुषंगाने संबंधित खातेप्रमुखांना  महापालिका आयुक्त सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी व गुरुवारी सकाळी १०.३० ते १२.३० वा. महापालिका आयुक्त कार्यालय, येथे सर्व खाते प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ भोसले यांनी दिले आहेत.

| नागरिकांच्या प्रश्नाचे स्वरुप जाणून घेतले जाणार

याबाबत महापालिका आयुक्त डॉ भोसले यांनी सांगितले कि, आयुक्त कार्यालयात सर्व खाते प्रमुख यांच्यासोबत बसून नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले जातील. त्यांच्या प्रश्नाचे स्वरूप जाणून घेण्यात येईल. त्यानंतर एक रूपरेषा ठरवली जाईल. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कुठले प्रश्न सोडवायला हवेत, खाते प्रमुख स्तरावर कुठले प्रश्न सोडवले जातील, तसेच आयुक्त स्तरावर कुठल्या प्रश्नाचा निपटारा करायचा, याचा आढावा घेतला जाईल. याबाबत एक धोरण तयार केले जाईल. त्यानुसार नागरिकांना कमीत कमी वेळात त्याचा प्रश्न कसा सोडवला जाईल, यावर अंमल केला जाईल. नागरिक केंद्रस्थानी ठेऊन या धोरणावर अमल केला जाईल. असेही आयुक्त डॉ भोसले यांनी सांगितले.