PMC Stationary Purchase | अखेर पुणे महापालिकेला स्टेशनरी साहित्य खरेदीला मिळाला मुहूर्त 

HomeपुणेBreaking News

PMC Stationary Purchase | अखेर पुणे महापालिकेला स्टेशनरी साहित्य खरेदीला मिळाला मुहूर्त 

गणेश मुळे Feb 14, 2024 6:40 AM

 Finally, various departments of the Pune municipal corporation (PMC) will get computers, printers, scanners! 
PMC Computers, Printer, Paper Purchase | अखेर महापालिकेच्या विविध विभागांना मिळणार संगणक, प्रिंटर, स्कॅनर! | बऱ्याच महिन्यापासून रखडली होती खरेदी 
 Finally, Pune Municipal Corporation (PMC) got the opportunity to buy stationery!

PMC Stationary Purchase | अखेर पुणे महापालिकेला स्टेशनरी साहित्य खरेदीला मिळाला मुहूर्त 

 

| 1 कोटी 94 लाखांची स्टेशनरी केली जाणार खरेदी 

 
 
PMC Central Store Department | पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation (PMC) रखडलेल्या स्टेशनरी खरेदी (PMC Stationary Purchase) प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कित्येक महिन्यापासून खरेदी झाली नव्हती. त्यामुळे विभागांना आवश्यक पेपर साठी रखडत बसावे लागत होते. मात्र आता महापालिकेने टेंडर प्रक्रिया पूर्ण केली आहे. विविध 53 प्रकारची स्टेशनरी खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी  1 कोटी 94 लाखांचा खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (PMC Central Store Department) 

पुणे महानगरपालिका (PMC Pune) ही राज्यातीत दुसऱ्या क्रमांकाची महानगरपालिका असुन तिचे बजेट अंदाजे 9 हजार कोटी जवळपास आहे. महानगरपालिकेत विविध खाती, क्षेत्रिय कार्यालये, असुन त्यांना दैनंदिन कामकाजा साठी मोठया प्रमाणावर साहित्य, वस्तु, मालाची  आवश्यकता असते. त्याची एकत्रितरित्या खरेदी करण्यासाठी  मध्यवर्ती भांडार विभागाची निर्मिती केली आहे. या विभागाकडुन खात्याच्या मागणी व आवश्यकतेनुसार वस्तु, साहित्य, माल खरेदी करून त्याचा पुरवठा  केला जातो. अशा खरेदीचे स्वतंत्र अधिकार इतर खात्याना नाहीत. असे असताना दैनंदिन वापरासाठी अत्यावश्यक असणारे पेपरची, टोनर सारख्या सामग्रीची खरेदी गेली काही महिन्यांपासुन भांडार विभागाकडून केली गेलेली नव्हती. याबाबत बरीच टीका झाल्यानंतर आता विभागाने सामग्री खरेदीस सुरुवात केली आहे.

स्टेशनरी खरेदी बाबत प्रशासनाने GeM पोर्टल कार्यपद्धती नुसार टेंडर प्रक्रिया राबवली होती. यात हेमदीप इंटरप्राइजेस यांचे दर सर्वात कमी म्हणजे 1 कोटी 94 लाख 6268 इतके होते. त्यानुसार या कंपनीला हे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध 53 प्रकारची स्टेशनरी घेतली जाणार आहे. यामध्ये A 4 पेपर 25000 रिम, लिगल पेपर 3000 रिम, लेजर पेपर 1 हजार रिम, शॉर्ट हॅन्ड बुक 500 नग, पेन, पेन्सिल, स्टेपलर पिन, अशा गोष्टींचा समावेश आहे.