PMC General Administration Department | सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार उपायुक्त्त प्रतिभा पाटील यांच्याकडे!
PMC General Administration Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या (PMC General Administration Department) उपायुक्त पदाची जबाबदारी उपायुक्त प्रतिभा पाटील (PMC Deputy Commissioner Pratibha Patil) यांच्याकडे देण्यात आली आहे. पाटील यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार असणार आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
महेश पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. मात्र कामकाजाच्या सोयीसाठी पाटील यांच्याकडून हा पदभार काढून घेण्यात आला आहे. महेश पाटील यांच्याकडे मालमत्ता व्यवस्थापन विभाग व दक्षता विभागाची जबाबदारी आहे. (Pune PMC News)
आता सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी प्रतिभा पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रतिभा पाटील यांच्याकडे भूसंपादन व व्यवस्थापन विभाग आणि मुख्य सुरक्षा अधिकारी पदाची जबाबदारी आधीच देण्यात आली होती.