PMC Engineers Promotion | ४५ वर्ष पूर्ण केलेले कनिष्ठ अभियंता पदोन्नतीपासून वंचित! | महापालिका आयुक्तांचे आदेश देखील डावलले

Homeadministrative

PMC Engineers Promotion | ४५ वर्ष पूर्ण केलेले कनिष्ठ अभियंता पदोन्नतीपासून वंचित! | महापालिका आयुक्तांचे आदेश देखील डावलले

Ganesh Kumar Mule May 07, 2026 6:55 PM

Maharashtra Bhushan Award | महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर
Dilip Vede Patil | वन उद्यानाचा वीज पुरवठा सुरळीत | नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या पुढाकाराने प्रशासनाचा गलथान कारभार उघड
Pune Property tax Hike | ५% करवाढीचा प्रस्ताव अमान्य करण्याचे सर्वपक्षीय  नगरसेवकांना जाहीर आवाहन!

PMC Junior Engineers Promotion | ४५ वर्ष पूर्ण केलेले कनिष्ठ अभियंता पदोन्नतीपासून वंचित! | महापालिका आयुक्तांचे आदेश देखील डावलले

| अभियंत्यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे मागितली दाद

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिकेतील पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती पासून वंचित ठेवणे ही आता नित्याची बाब झाली आहे. याचा फटका इतके दिवस लेखनिकी संवर्गातील कर्मचाऱ्यांना बसत होता. आता याचा फटका अभियांत्रिकी संवर्गातील कर्मचाऱ्यांना देखील बसत आहे. सेवा प्रवेश नियमावली २०१४ मधील तरतुदींचे उल्लंघन करून ४५ वर्षे पूर्ण केलेल्या काही कनिष्ठ अभियंत्यांना शाखा अभियंता या पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे वारंवार तक्रारी करून आणि नियम दाखवून देखील त्यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा महापालिका आयुक्त यांचा दरवाजा ठोठावला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महानगरपालिका यांच्या सेवा प्रवेश नियमावली २०१४ मधील तरतुदीनुसार पात्र असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती प्रक्रियेमध्ये न्याय मिळणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ४५ वर्षे पूर्ण केलेल्या अनेक कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे.

३१ मार्च २०२१ च्या शासन निर्णयानुसार पदोन्नती प्रक्रिया पारदर्शक व नियमसंगत पद्धतीने राबविणे आवश्यक असताना, संबंधित विभागाने चुकीच्या निकषांचा अवलंब करून पात्र कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे संबंधित कनिष्ठ अभियंत्यांचे सेवा हक्क, आर्थिक लाभ व वरिष्ठता यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. असा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

वय वर्षे ४५ पूर्ण झाल्यानंतर विभागीय परीक्षेबाबत आर आर म्हणजे सेवा प्रवेश नियमावली नुसार सूट ची तरतूद असून देखील प्रशासन मनमानी करून काढलेले परिपत्रके नाचवत अभियंत्याचे नुकसान करत आहे. पुणे मनपा सेवक वर्ग विभाग प्रशासन गेली काही वर्षांपासून आपल्या सोयी नुसार कामे करत आहे. असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

पुणे मनपा प्रशासन शासनाकडील आधारित परिपत्रकाच्या आधारे वेळोवेळी कार्यवाही करत असते. २०१८ मध्ये विभागीय परीक्षेबाबत वय वर्षे ४५ ते ५० बाबत काढण्यात आलेले परिपत्रकानुसार सदरचे दिनांक नंतर लागू असले बाबत स्पष्ट आदेश असताना देखील पुणे मनपा प्रशासन मनमानी करून अभियंत्याचे नुकसान करीत आहेत. याबाबत महापालिका आयुक्त यांनी यात दखल घेऊन शासन स्तरावर मार्गदर्शन घेणे बाबत प्रशासनास आदेश द्यावेत. अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त यांचे देखील आदेश डावलले

महापालिका सेवा प्रवेश नियम मध्ये कोणतीही पन्नास वर्षाची अट नाही. शाखा अभियंता पदोन्नतीसाठी निवेदन सादर केल्यावर महापालिका आयुक्त यांनी आर आर प्रमाणे कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. असे असताना देखील सेवक वर्ग अर्थात सामान्य प्रशासन विभाग जुनी परिपत्रके नाचवत आहे, असा आरोप देखील या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान याबाबत सामान्य प्रशासन विभागाला विचारले असता सांगण्यात आले कि, याबाबत कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची पडताळणी करून पुढील कार्यवाही करू. तसेच पुढील पदोन्नती मध्ये काही जागा रिकाम्या ठेवल्या आहेत, त्यावेळी त्यांना संधी दिली जाईल. दरम्यान प्रशासनाने असे पोकळ आश्वासन दिले असले तरीही पुढील पदोन्नती मध्ये सेवाज्येष्ठतेचा प्रश्न उपस्थित होणार आहे. याबाबत प्रशासन काही काळजी घेणार आहे का, असा प्रश्न कर्मचारी विचारत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: