PMC Sky Sign Department | जाहिरात फलकासाठी तात्पुरती मान्यता | १ एप्रिल पासून नवीन दर आकारले जाणार

Homeadministrative

PMC Sky Sign Department | जाहिरात फलकासाठी तात्पुरती मान्यता | १ एप्रिल पासून नवीन दर आकारले जाणार

Ganesh Kumar Mule May 08, 2026 9:03 PM

PMC Assistant Sports Officer | सहाय्यक क्रीडा अधिकारी पदावर यांना मिळाली पदोन्नती | अतिरिक्त आयुक्तांनी जारी केले आदेश 
Pune Women Congress on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना’महागाई रत्न’ पुरस्कार जाहीर | पुणे शहर महिला काँग्रेसची घोषणा
Vishwajit Kadam Congress | पुणे काँग्रेसला नवी उभारी देणार; दोन्ही शहराध्यक्ष सर्वांना सोबत घेऊन काम करतील:  डॉ. विश्वजित कदम

PMC Sky Sign Department | जाहिरात फलकासाठी तात्पुरती मान्यता | १ एप्रिल पासून नवीन दर आकारले जाणार

| मुख्य सभा दर निश्चित करेपर्यंत पूर्वलक्षी प्रभावाने दर लागू होणार

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेने शहरातील जाहिरात फलकाचे परवाना शुल्क सुधारित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वाढीव दराला मुख्य सभेने मंजुरी दिलेली नाही. दराचा विषय प्रलंबित आहे. मात्र यामुळे परवाना नूतनीकरण प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे जाहिरात फलकासाठी  तात्पुरती हंगामी मान्यता देण्यात आली आहे. १ एप्रिल पासून मुख्य सभा दर निश्चित करेपर्यंत पूर्वलक्ष्यी प्रभावाने हे नवीन दर लागू होणार आहेत. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी जारी केले आहेत.  (Pune PMC News)

महापालिका प्रशासन कडून जाहिरात फलक नियमन व नियंत्रण नियमानुसार नवीन दर ठरवण्यात आले होते. त्यानुसार हे दर २२२ रुपये प्रति चौरस फुटावरून ५८० ते ७०० इतका करण्यात आला होता.  जाहिरात फलकासाठी वर्ष २०२३ ते २०२६ साठी ५८० रु इतका दर तर २०२६ ते २०२९ सालासाठी ७०० रु असा दर केला होता. या बाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिली होती. मात्र आचारसंहिता लागू झाल्याने या धोरणाला मुख्य सभेची मान्यता मिळू शकली नव्हती. नगरसेवक आल्यानंतर मुख्य सभेत याचा निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र मुख्य सभेचे हे दर फेटाळून लावले आणि फेर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. (Pune Municipal Corporation – PMC)

मात्र दर निश्चित करण्यात न आल्याने महापालिकेचे नुकसान होईल, अशी भीती प्रशासनाला आहे. त्यामुळे जाहिरात फलकाला हंगामी मान्यता देण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून जारी करण्यात आले आहेत. दर निश्चित होताच निश्चित करण्यात आलेले शुल्क १ एप्रिल २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार आहे. जे फलकधारक हंगामी मान्यता घेतील, त्यांसाठी हाच नियम असणार आहे. शुल्क निश्चित होईपर्यंत आगाऊ रक्कम स्वीकारणे बंधनकारक नाही. अंतिम दर निर्धारण हे मुख्य सभेच्या निर्णया नंतरच होणार आहे.

हंगामी मान्यता मिळवण्यास पात्र असलेल्या फलक धारकानी ४५ दिवसांच्या आत कागदपत्रे आकाशचिन्ह विभागाकडे सादर करायची आहेत. नूतनीकरण करताना परवाना शुल्क ६ महिन्याचे भरणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील ६ महिन्याचे शुल्क सप्टेंबर पूर्वी भरणे आवश्यक आहे. कागदपत्रे ४५ दिवसांच्या आत सादर नाही केली तर हंगामी मान्यता आपोआप रद्द होईल. अंतिम मान्यता मिळाल्यानंतर QR कोड दिला जाणार आहे. हंगामी मान्यता ही नूतनीकरण नाही तर तात्पुरती मान्यता आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: