Palkhi Sohala 2026 | पालखी सोहळ्याच्या समन्वयासाठी उपायुक्त दर्जाचा अधिकारी | महापालिका आयुक्तांचे आदेश 

Homeadministrative

Palkhi Sohala 2026 | पालखी सोहळ्याच्या समन्वयासाठी उपायुक्त दर्जाचा अधिकारी | महापालिका आयुक्तांचे आदेश 

Ganesh Kumar Mule May 09, 2026 7:27 PM

Swine Flu | PMC | शहरात स्वाईन फ्लू वेगाने पसरतोय  | ऑगस्ट च्या पहिल्याच आठवड्यात १५९ positive रुग्ण 
Parbhani Violence | संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा |  रिपब्लिकन पक्षाची मागणी
Pune PMC News |  वारजेतील DP रस्ता आणि मुठा नदी सुधार प्रकल्पाचा घोळ | प्रशासनाचा मोठा खुलासा

Palkhi Sohala | पालखी सोहळ्याच्या समन्वयासाठी उपायुक्त दर्जाचा अधिकारी | महापालिका आयुक्तांचे आदेश

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा नियोजन संदर्भात नोडल अधिकारी आणि समन्वयक म्हणून महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी उपायुक्त निखील मोरे यांची नियुक्ती केली आहे. नुकतेच आयुक्तांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. (Naval Kishore Ram IAS)

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या सन २०२६ च्या आषाढी पालखी सोहळा दरम्यानच्या महानगरपालिके मार्फत करावयाच्या कामकाजाच्या समन्वया करिता भूसंपादन व व्यवस्थापन विभागचे उपायुक्त निखील मोरे   यांची नोडल अधिकारी व समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विश्वस्त आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विश्वस्त तसेच वाहतूक पोलीस विभाग, इतर विभाग यांचेशी सन्मवय साधून पुणे महानगरपालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांशी वेळोवेळी सन्मवय साधून त्यांच्या मार्फत पालखी सोहळा २०२६ बाबत आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून घेण्यात यावी आणि याबाबत वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल सादर करावा. असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: