PMC Road Project | दक्षिण पुण्यातील 3 मोठे रस्ते प्रकल्प | कात्रज-कोंढवा, गंगाधाम चौक उड्डाणपूल आणि नवले पूल सर्व्हिस रोडला गती!

Homeadministrative

PMC Road Project | दक्षिण पुण्यातील 3 मोठे रस्ते प्रकल्प | कात्रज-कोंढवा, गंगाधाम चौक उड्डाणपूल आणि नवले पूल सर्व्हिस रोडला गती!

Ganesh Kumar Mule Aug 12, 2026 7:41 PM

Pune Book Festival | पुस्तकरूपी संविधान प्रतिकृती उभारण्याचा जागतिक विश्वविक्रम | पुणे पुस्तक महोत्सवात तिसरा विश्वविक्रम
7th Pay Commission | सातवा वेतन आयोग फरक रक्कम | सेवानिवृत्त सेवकांची बिले तात्काळ तपासून घ्या  | अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश | आगामी 4 दिवसात मिळणार फरकाची रक्कम 
PMC Pune Additional Commissioner | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदावर उपायुक्त रमेश शेलार यांचा दावा | नाव डावलल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

PMC Road Project | दक्षिण पुण्यातील 3 मोठे रस्ते प्रकल्प | कात्रज-कोंढवा, गंगाधाम चौक उड्डाणपूल आणि नवले पूल सर्व्हिस रोडला गती!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज 12 ऑगस्ट  रोजी शहरातील पथ विभागाच्या 3 महत्वाच्या प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम चौकातील नियोजित उड्डाणपूल आणि वडगाव येथील नवले पूलाजवळील सर्व्हिस रस्त्याच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. (Naval Kishore Ram IAS)

1. कात्रज-कोंढवा रस्ता – 8 वर्षांनंतर गती
दक्षिण पुण्यासाठी महत्वाचा असलेला कात्रज-कोंढवा रस्ता भूसंपादन न झाल्याने 2017-18 पासून रखडला होता. आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी भूसंपादनाची प्रक्रिया जलद केली. त्यामुळे आता रस्त्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.

आयुक्तांनी विद्युत विभागाला रस्त्यात येणारे पोल आणि ट्रान्सफॉर्मर 1 आठवड्यात स्थलांतरित करण्याचे आदेश दिले. तसेच ट्रान्सफॉर्मरसाठी जागा उपलब्ध करून देण्याची सूचना मालमत्ता विभागाला दिली.
अजूनही 10 मिळकतींचे भूसंपादन बाकी आहे. ते तातडीने पूर्ण करण्याचे आदेश विशेष भूसंपादन अधिकारी आणि उपायुक्त भूसंपादन यांना दिले. पुढील आठवड्यात सर्व अडथळ्यांचा नकाशासह अहवाल घेऊन बैठक घेण्याचे निर्देश नोडल अधिकाऱ्यांना देण्यात आले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा राजस चौक येथील उड्डाणपूल आणि कात्रज-कोंढवा रस्ता पूर्ण झाल्यास मुंबई-बेंगलोर महामार्गावरील जड वाहतूक सुरळीत होईल. माऊलीनगर, शेलारमळा, उत्कर्ष सोसायटी, राजस चौक, गोकुळनगर भागातील वाहतुकीलाही दिलासा मिळेल.

2. गंगाधाम चौक उड्डाणपूलाचे काम सुरू करा
गंगाधाम चौकात होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी करून तातडीने काम सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. चौकाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी कलम 205 अंतर्गत काम सुरू आहे. काही मिळकतधारकांनी जागा दिली नसल्याने त्यांच्याशी चर्चा करून तडजोडीने जागा ताब्यात घेण्याचे निर्देश दिले.
हा पूल पूर्ण झाल्यास मार्केट यार्ड ते कोंढवा दरम्यानची वाहतूक कोंडी कमी होईल.

3. नवले पूल सर्व्हिस रोडचे रखडलेले काम पूर्ण करा
वडगाव येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नवले पूलाजवळ स्वर्ण हॉटेल ते कुदळे कमानी पर्यंतचे सुमारे 200 मीटरचे काम रखडले आहे. संबंधित जागामालकांशी चर्चा करून किंवा तडजोडीने जागा ताब्यात घेण्याचे आदेश दिले. हा रस्ता झाल्यास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर, मुख्य अभियंता विद्युत मनीषा शेकटकर, उपायुक्त निखिल मोरे, उपायुक्त अरविंद माळी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

या 3 प्रकल्पांमुळे दक्षिण पुण्यातील वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

—

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: