PMC Recruitment Rules | आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, उप आरोग्य निरीक्षक व प्रमुख आरोग्य निरीक्षक या पदाच्या सेवा नियमात केली जाणार दुरुस्ती! 

Homeadministrative

PMC Recruitment Rules | आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, उप आरोग्य निरीक्षक व प्रमुख आरोग्य निरीक्षक या पदाच्या सेवा नियमात केली जाणार दुरुस्ती! 

Ganesh Kumar Mule Mar 06, 2026 9:14 PM

Pune PMC News | विविध विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणुका २७ फेब्रुवारीला 
PMC Municipal Secretary | योगिता भोसले यांना नगरसचिव पदावर पदोन्नती | विधी समिती आणि मुख्य सभेची एकाच दिवशी मान्यता!
PMC Standing Committee | स्थायी समिती सह सर्व विषय समित्या आज अस्तित्वात येणार | आजच्या विशेष सभेत निवडले जाणार सदस्य

PMC Recruitment Rules | आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, उप आरोग्य निरीक्षक व प्रमुख आरोग्य निरीक्षक या पदाच्या सेवा नियमात केली जाणार दुरुस्ती!

 

PMC Solid Waste Management Department – (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील “आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, उप आरोग्य निरीक्षक व प्रमुख आरोग्य निरीक्षक” या पदाच्या पुणे महानगरपालिका सेवा (सेवा व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ मध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे.  सुधारित प्रस्तावास महाराष्ट्र  शासनाची मान्यता आवश्यक आहे. त्यानुसार प्रस्ताव सरकार कडे पाठवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून हा प्रस्ताव विधी समिती समोर ठेवण्यात आला आहे. विधी समिती ची मान्यता मिळाल्या नंतर हा प्रस्ताव मुख्य सभेसमोर ठेवला जाईल. त्यानंतर प्रस्ताव राज्य सरकार कडे पाठवला जाईल.  या पदांच्या पद भरतीत अडचणी निर्माण होत आहेत, त्यामुळे हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे. (PMC Law Committee)

पुणे महानगरपालिका सेवा (सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ मधील घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील काही  पदाची अर्हता व नियुक्तीच्या पद्धतीत सुधारणा करण्यात येणार आहे.

——-

प्रमुख आरोग्य निरिक्षक (मंडई अधिकारी) | मंजूर पदसंख्या : ६

प्रचलित पद्धत काय आहे? | पदोत्रती १००% – पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे प्रमुख आरोग्य निरिक्षक या पदावरील किमान ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

प्रस्तावित सुधारणा अशी आहे | पदोत्रती १००% – अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी व स्वच्छता निरीक्षक पदविका धारण करणे आवश्यक आहे. आणि ब) पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवाज्येष्ठतेच्या आधारे उप आरोग्य निरीक्षक या पदावरील किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

———–

उप आरोग्य निरिक्षक (सिलेक्शन ग्रेड सिनिअर सेनिटर इन्स्पेक्टर) | मंजुर पदसंख्या :४

प्रचलित तरतूद काय आहे? –  नामनिर्देशन – ५०% अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरिक्षक पदविका. (ब) कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील उप मुख्य स्वच्छता अधिकारी या संवर्गातील किमान ०५ वर्षांचा अनुभव. शास्त्र शाखेची पद्विधारकास प्राधान्य.

पदोन्नती – ५०% – नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे कार्यरत आरोग्य निरिक्षक या पदावर किमान ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

प्रस्तावित सुधारणा अशी आहे – पदोत्रती १००% | अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी व स्वच्छता निरिक्षक पदविकाधारण करणे आवश्यक आहे. आणि ब) पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवाज्येष्ठतेच्या आधारे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक पदावरील किमान ३ वर्षा अनुभव असणे आवश्यक

————-

वरिष्ठ आरोग्य निरिक्षक (सिनिअर सॅनिटर इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य अधिकारी) | मंजूर पदसंख्या : ४३

प्रचलित तरतूद काय आहे? | नामनिर्देशन- ७५% – अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता. निरिक्षक पदविका. ब) कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य निरीक्षक/स्वच्छता निरीक्षक या संवर्गातील किमान ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. क) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.

पदोन्नती- २५%नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे कार्यरत  आरोग्य निरिक्षक या पदावर किमान ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

प्रस्तावित सुधारणा अशी आहे – पदोन्नती १००% – अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पद व स्वच्छता निरिक्षक पदविका धारण करणे आवश्यक आहे. ब) पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवाज्येष्ठतेच्या आधारे आरोग्य निरीक्षक वा पदावरील किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

———-

 

आरोग्य निरिक्षक सॅनिटर इन्स्पेक्टर/ वसाहत अधिकारी(गवनि) : मंजूर पदसंख्या -२६८

प्रचलित तरतूद काय आहे? | नामनिर्देशन – ५०% – अ) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि स्वच्छता निरिक्षक पदविका उत्तीर्ण. ब) संबंधित कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. क) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.
पदोत्रती ५०% – नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे कार्यरत कर्मचाऱ्या   मधून किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

प्रस्तावित सुधारणा अशी आहे – नामनिर्देशन – ५०% १) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि स्वच्छता निरिक्षक पदविका उत्तीर्ण २) संबंधित कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक ३) कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण.

पदोत्रती ५०% – नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे कार्यरत कर्मचाऱ्यामधून मंजूर पदावरील  किमान ३ वर्षाची सेवा असणे आवश्यक.


प्रस्तावात म्हटले आहे कि, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक या पदाच्या पदभरतीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत.  स्थानिक स्वराज्य संस्थामधील ५ वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार मिळत नाहीत. सध्या ११ जागा रिक्त आहेत. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक या पदाच्या सेवाज्येष्ठता यादीतील सेवकांचा अनुभव हा दीर्घ आहे. मनपाचे प्रशासकीय सोय लक्षात घेता मनपा मध्ये कार्यरत असणाऱ्या सेवकांचा अनुभव व ज्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरोग्य निरीक्षक यांचा अनुभव निश्चितच पदोन्नती पदाच्या कामकाजाकरिता सोयीचा ठरतो. त्यामुळे हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: