PMC Municipal Secretary | योगिता भोसले यांना नगरसचिव पदावर पदोन्नती | विधी समिती आणि मुख्य सभेची एकाच दिवशी मान्यता!

Homeadministrative

PMC Municipal Secretary | योगिता भोसले यांना नगरसचिव पदावर पदोन्नती | विधी समिती आणि मुख्य सभेची एकाच दिवशी मान्यता!

Ganesh Kumar Mule Jan 17, 2025 8:31 PM

Uruli Devachi and Fursungi | कचरा डेपोची जागा मनपा हद्दीत ठेऊन उरुळी व फुरसुंगी गावे वगळली जाणार! | मुख्य सभेसमोर प्रस्ताव 
TP Scheme : PMC GB : टीपी स्किमचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध करण्यास मुख्य सभेची मान्यता 
Property Tax : 23 Villeges : समाविष्ट 23 गावांतील मिळकतींना टॅक्स मध्ये 15-27% सवलत!  

PMC Municipal Secretary | योगिता भोसले यांना नगरसचिव पदावर पदोन्नती | विधी समिती आणि मुख्य सभेची एकाच दिवशी मान्यता!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation – PMC) गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्त असलेल्या नगरसचिव (PMC Municipal Secretary) पदावर अखेर अधिकारी मिळाला आहे. राजशिष्टाचार अधिकारी तथा उप नगरसचिव योगिता भोसले (Yogita Bhosale PMC) यांना नगरसचिव (पे मॅट्रिक्स- S- २३) या पदावर पदोन्नती दिली आहे. बढती समितीने त्यांची शिफारस केल्यानंतर आज एकाच दिवशी विधी समिती (PMC Law Committee) आणि मुख्य सभेने (PMC General Body Meeting) या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. दरम्यान भोसले या महापालिकेतील पहिल्या महिला नगरसचिव ठरल्या आहेत. (Pune Municipal Corporation Municipal Secretary)

पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) पूर्ण वेळ नगरसचिव (Full Time Municipal secretary) असणारे सुनील पारखी 30 ऑगस्ट 2020 ला निवृत्त झाले. तसेच उप नगरसचिव 30 सप्टेंबर 2020 निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवीन नगरसचिव नेमण्यासाठी महापालिकेकडून भरती प्रक्रिया (PMC Pune Recruitment) राबवण्यात आली होती. त्यानुसार या पदभरतीबाबत जाहिरात देण्यात आली होती.  परंतु एकही उमेदवार सक्षम आढळला नाही.  नगरसचिवांच्या कामकाजाची माहिती कोणालाच नव्हती.  या कारणास्तव ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यानंतर अद्याप कोणतीही प्रक्रिया केली गेली नाही. 3 वर्ष झाली तरी देखील महापालिकेला (PMC Pune) हे पद भरता आले नाही. नगरसचिव नसल्याने उपनगरसचिव पद देखील भरण्यात आले नाही. महापालिका प्रभारी पदभार देऊन काम चालवत आहे. मात्र पुन्हा पद भरती बाबत जाहिरात दिली नाही. किंवा पदोन्नती च्या माध्यमातून उपनगरसचिव पद देखील भरण्यात आले नाही. महापालिकेचे एवढे महत्वाचे पद असताना देखील याबाबत महापालिका प्रशासनाची उदासीनता लक्षात येत होती. (PMC Pune Municipal Secretary)

 – भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती

सुनील पारखी निवृत्त झाल्यानंतर महापालिकेने  नगरसचिवांच्या नियुक्ती प्रक्रियेबाबत प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार पद भरती प्रक्रिया जलद करण्यात आली होती.  त्याची जाहिरात काढण्यात आली.  महापालिकेकडे एकूण 42 अर्ज आले होते.  यातील बहुतांश अर्ज महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे होते.   अर्ज तपासल्यानंतर 29 लोक त्यात पात्र ठरले.  पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.  परंतु नंतर ही प्रक्रिया अनेक दिवस पुढे जाऊ शकली नाही.  त्यानंत ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. कारण 29 पैकी एकाही उमेदवाराला नगरसचिवांच्या कामकाजाची माहिती नव्हती. यामुळे, आता एक नवीन प्रक्रिया राबवली जाईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यानंतर अद्याप कोणतीही प्रक्रिया केली गेली नाही. 3 वर्ष होत आली तरी देखील महापालिकेला हे पद भरता आले नाही. याबाबत महापालिकेची उदासीनता लक्षात आली. त्या नंतर प्रभारी नगरसचिव म्हणून योगिता भोसले काम पाहत होत्या.

उप नगरसचिव पदावरील ३ वर्षाचा अनुभव ग्राह्य धरला

दरम्यान नुकतेच प्रशासनाने पदोन्नती च्या माध्यमातून या पदावर अधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू केली होती. महापालिकेतील नगरसचिव हे पद नामनिर्देशन किंवा पदोन्नती ने भरण्यात येते. पदोन्नती ने हे पद भरण्यासाठी सेवाज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारावर उप नगरसचिव पदावरील ३ वर्षांचा अनुभव ग्राह्य धरला जातो. भोसले यांच्याकडे राजशिष्टाचार अधिकारी तथा उप नगरसचिव पदाचा ३ वर्षाचा अनुभव आहे. असे पदोन्नती समितीने मानले आणि भोसले यांची नगरसचिव पदासाठी शिफारस केली. त्यानंतर प्रशासनाने हा प्रस्ताव आजच विधी समितीच्या माध्यमातून मुख्य सभे समोर ठेवला. या प्रस्तावाला दोन्ही ठिकाणी मंजुरी देण्यात आली.

– महापालिकेत नगरसचिव  पद महत्वाचे

महानगरपालिकेच्या कामकाजात नगरसचिव हे पद अत्यंत महत्वाचे आहे. (Pune Municipal Corporation Municipal secretary) महापालिका आयुक्तांनंतर नगरसचिव हे पद महत्त्वाचे आहे.  प्रशासनाच्या तसेच महापौरांसह राजकीय लोकांच्या समन्वयाची जबाबदारी नगरसचिवावर असते. मुख्य सभा, महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या नियोजनापासून ते त्याचे कार्यपत्रक प्रकाशित करण्यापर्यंत, सभेचे संघटन, त्याच्याशी संबंधित निवडणूक प्रक्रिया, विशेष विषय समित्यांची प्रक्रिया आणि त्याच्या निवडणुकीची प्रक्रिया देखील नगरसचिव करतात. महापौर कार्यालयाचे सर्व काम देखील नगरसचिव करतात.  यामुळे महानगरपालिकेच्या कामकाजात नगरसचिवाची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

—-

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0