Pune Metro on Women and Senior Citizen | पुणे मेट्रोमध्ये ८ मार्चपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष राखीव जागांची सुविधा!

Homeadministrative

Pune Metro on Women and Senior Citizen | पुणे मेट्रोमध्ये ८ मार्चपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष राखीव जागांची सुविधा!

Ganesh Kumar Mule Mar 06, 2026 7:18 PM

Chit Fund Amendment Bill | चिटफंड सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर  | राज्य शासनाचे अपिलाचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास
PMC IWMS | महापालिकेच्या कामाच्या एस्टीमेटपासून ते कामाचे बिल अदा करण्यापर्यंतची सर्व कामे पेपरलेस होणार | शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांची माहिती
7th Pay Commission | सप्टेंबर संपला, ऑक्टोबर आला तरी फरकाची रक्कम मिळेना | गेल्या चार महिन्यांत 100 बिले देखील तयार झाली नाहीत 

Pune Metro on Women and Senior Citizen | पुणे मेट्रोमध्ये ८ मार्चपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष राखीव जागांची सुविधा!

 

Pune Metro News – (The Karbhari News Service) – पुणे मेट्रोकडून महिला आणि जेष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवार, ८ मार्च  पासून जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोच्या सर्व मेट्रो ट्रेनमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष राखीव जागा ठेवण्यात येणार आहेत. (Pune Breaking News)

पुणे मेट्रोच्या ट्रेनमधील तीनही कोचेसमध्ये ही नवीन आसन व्यवस्था लागू करण्यात आली असून, यामुळे विशेषतः वृद्ध नागरिक आणि महिला प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. पुणे मेट्रोच्या ट्रेनमधील तीनही कोचेसमध्ये ही नवीन आसन व्यवस्था लागू करण्यात आली असून, यामुळे विशेषतः वृद्ध नागरिक आणि महिला प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. अशी माहिती मेट्रो प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

सध्या राखीव जागांचे नियोजन असे असेल :

कोच (डबा)                      महिलांसाठी        ज्येष्ठ नागरिकांसाठी

पहिला कोच (DMA Car)  १४                     ०२
मधला कोच (T-Car)          १८                   ०४
तिसरा कोच (DMB Car)  १४                     ०२
एकूण                               ४६                     ०८

 

मेट्रोच्या प्रत्येक ट्रेन मध्ये महिला प्रवाश्यांसाठी ४६ जागा, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ०८ (आठ) जागा राखीव असणार आहेत.

या आसन व्यवस्थेचा सविस्तर आराखडा (Drawing Layout) पुणे मेट्रोच्या सर्व स्थानकांवर आणि अधिकृत ॲपवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. मेट्रोच्या डब्यांमध्ये दर्शवलेल्या चिन्हांनुसार (Signage) राखीव जागा ओळखून त्यानुसारच बसण्याची विनंती प्रवाशांना करण्यात आले आहे.

पुणे मेट्रो प्रवाशांना या राखीव जागांच्या नियमांचे पालन करण्याचे आणि सहप्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: