PMC Sport Committee Proposals | पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच खाजगी संस्थांचे व व्यक्तींचे  प्रस्ताव क्रीडा समितीच्या कार्यपत्रिकेवर!

Homeadministrative

PMC Sport Committee Proposals | पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच खाजगी संस्थांचे व व्यक्तींचे  प्रस्ताव क्रीडा समितीच्या कार्यपत्रिकेवर!

Ganesh Kumar Mule Mar 26, 2026 2:28 PM

PMC Employees Union | वैद्यकीय योजना मोडीत काढणारा स्थायी समितीचा ठराव रद्द करा  | कामगार मेळाव्यात कामगार संघटना आणि राजकीय पक्ष आक्रमक भूमिकेत 
BJP Pune | जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने ७५५०० झाडे लावण्याचा संकल्प
Devendra Fadnavis | MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

PMC Sport Committee Proposals | पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच खाजगी संस्थांचे व व्यक्तींचे  प्रस्ताव क्रीडा समितीच्या कार्यपत्रिकेवर!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेत मुख्य सभा, स्थायी समिती व विविध विशेष समित्या अस्तित्वात आहेत. त्यामध्ये जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी अर्थात नगरसेवक यांचे प्रस्ताव व मनपा प्रशासनाकडून विचारासाठी आलेली विषय पत्रे विशेष समित्यांपुढे सादर केले जातात. परंतु महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच क्रीडा समिती सारख्या समितीमध्ये खाजगी संस्थांचे आणि व्यक्तींचे प्रस्ताव विचारासाठी  नगर सचिव विभागाकडून ठेवण्यात आले आहेत. यामुळे विभागाच्या कामकाज पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (PMC Municipal Secretary Department)

क्रीडा समितीच्या सोमवार  30 मार्च रोजी भरणाऱ्या सभेत विचारासाठी असलेल्या विषय क्र. 7 ते 11 या एकूण 5 विषयांपैकी विषय क्र.9 हा प्रस्ताव सभासद यांच्या स्वाक्षरीने सादर झाला आहे. उर्वरित 4 विषय हे अनुक्रमे पुणे जिल्हा आंतरकचेरी क्रीडा संघटना, बॉक्सिंग असोसिएशन ऑफ पुणे, कुस्ती मल्लविद्या व महासंघ व दादाजी स्पीरिच्युअल फाउंडेशन यांनी नगरसचिव यांना दिलेल्या पत्रानुसार सादर केलेले आहेत. अशा प्रकारे शहरातील संस्था, नागरीक व मंडळे यांनी सादर केलेली पत्रे  समित्यांपुढे विचारासाठी सादर केल्यास हजारो प्रस्ताव समित्यांपुढे सादर करावे लागतील. असे बोलले जात आहे.

सद्यस्थितीत म्हणजे मुख्य सभा अस्तिवात आल्यापासून  नगर सचिव यांच्या कामाची व्याप्ती वाढली आहे. शिवाय विशेष समित्यांची कामे करणारे कर्मचारी हे देखील नवीनच आहेत. तसेच नगरसचिव यांना या कामासाठी आवश्यक उपनगरसचिव, प्रोटोकॉल ऑफिसर, कार्यालय अधीक्षक यासारखी महत्त्वाची वरिष्ठ पदे वार्षानुवर्षे न भरल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. अशी चर्चा या निमित्ताने केली जात आहे.


खाजगी संस्थांचे व व्यक्तींचे  प्रस्ताव क्रीडा समितीच्या कार्यपत्रिकेवर येणे, हे आमच्याकडून नजरचुकीने झाले आहे. आमच्या विभागाकडून  कार्यपत्रिका दुरुस्त केली जाईल. त्यानंतर समिती अध्यक्ष आणि सभासदांना शुद्धिपत्रक काढून कार्यपत्रिका पाठवली जाईल.

| योगिता भोसले, नगरसचिव, पुणे मनपा. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: