PMC PT 3 Application form | प्रॉपर्टी टॅक्स विभाग घेणार अतिरिक्त 500 कर्मचारी | शहरातील 4 लाख मिळकतींचा केला जाणार सर्वे! 

HomeपुणेBreaking News

PMC PT 3 Application form | प्रॉपर्टी टॅक्स विभाग घेणार अतिरिक्त 500 कर्मचारी | शहरातील 4 लाख मिळकतींचा केला जाणार सर्वे! 

गणेश मुळे May 27, 2024 3:48 PM

  5182 crores owed to the Pune municipal corporation by only 1746 big people with arrears of more than 1 crore
Pune Property Tax | प्रॉपर्टी टॅक्स मधून पुणे महापालिकेच्या तिजोरीत 2273 कोटी जमा | मागील वर्षीपेक्षा 308 कोटी ने अधिक उत्पन्न
PMC will provide online facility to Pune residents to fill PT 3 application

PMC PT 3 Application form | प्रॉपर्टी टॅक्स विभाग घेणार अतिरिक्त 500 कर्मचारी | शहरातील 4 लाख मिळकतींचा केला जाणार सर्वे!

PMC Property tax Department- (The Karbhari News Service) – पुणे शहरातील स्व-वापराच्या निवासी मिळकतींना मिळकत करात 40% सवलतीच्या अनुषंगाने पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) प्रायोगिक तत्वावर तपासणी मोहीम सुरु करण्यात आली होती. त्याचा आधार घेऊन आता संपूर्ण शहरात ही मोहीम राबवली जाणार आहे. सुमारे 4 लाख मिळकतींचा सर्वे केला जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त 500 कर्मचारी घेतले जाणार आहेत. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी दिली. (PMC Property tax Department)

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील स्व-वापराच्या निवासी मिळकतीस 40% सवलतीच्या अनुषंगाने वडगाव धायरी, वडगाव बुद्रुक व हिंगणे या भागात प्रायोगिक तत्वावर 6 मे पासून भेट देण्यात आली होती. मिळकतधारक स्वतः राहत असल्यास, त्यांचेकडून 40%  सवलतीचा PT-3 form नागरिकांना हस्तांतरित करण्यात आला.  मिळकतधारक स्वतः राहत असल्यास, याबाबत मिळकतधारकांनी PT 3 form भरताना सादर केलेल्या कागद पत्रानुसार तपासणी करण्यात येत होती.
याचाच आधार घेऊन आता पुणे महापालिका पूर्ण शहरभर ही तपासणी मोहीम राबवणार आहे. यात नागरिकांकडून तात्काळ PT 3 भरून घेण्यात येणार आहे. घरात स्वतः राहत असल्यासच मिळकतधारकाला सवलत मिळणार आहे. असे जगताप यांनी सांगितले. जगताप यांनी सांगितले कि, नागरिकांसाठी ही शेवटची सवलत असणार आहे. यानंतर PT 3 form भरण्याची संधी दिली जाणार नाही. विविध विभागातील 500 कर्मचारी यासाठी घेतले जाणार आहेत. असेही जगताप यांनी यावेळी सांगितले.