Prajit Nair IAS | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी प्राजीत नायर! | राज्य सरकार चे आदेश जारी

Homeadministrative

Prajit Nair IAS | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी प्राजीत नायर! | राज्य सरकार चे आदेश जारी

Ganesh Kumar Mule Apr 02, 2026 9:06 PM

Pune Closed | महत्वाची बातमी | उद्या पुणे बंद | विविध संघटना आणि राजकीय पक्ष होणार सहभागी
PMC election 2022 | सर्वांत जास्त मतदार असलेला प्रभाग धायरी-आंबेगाव  | सहा प्रभागात महिला मतदारांची संख्या जास्त | प्रारूप मतदारयाद्या जाहीर 
Recruitment News | नगर रचना विभागाच्या शिपाई पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी

Prajit Nair IAS | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी प्राजीत नायर! | राज्य सरकार चे आदेश जारी

 

 

PMC Additional Commissioner – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांच्या राज्य सरकारकडून बदली करण्यात आली आहे. पृथ्वीराज हे आता वसई विरार महापालिकेचे आयुक्त असतील. दरम्यान पुणे महापालिकेचे एक अतिरिक्त आयुक्त पद आता रिक्त झाले आहे. इथे राज्य सरकार कुठला अधिकारी नियुक्त करणार, यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यानुसार सरकारने गोंदिया चे जिल्हाधिकारी राहिलेले प्राजीत नायर (Prajit Nair IAS) यांची अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत.  (Pune PMC News)

पृथ्वीराज बी पी यांचा पुणे महापालिकेतील कार्यकाळ संपत आला होता. त्यानुसार सरकारने त्यांची बदली केली आहे. वसई विरार महापालिकेचे आयुक्त एम एम सूर्यवंशी  सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी पृथ्वीराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

पृथ्वीराज यांची बदली झाल्यानंतर पुणे महापालिकेत कोण येणार याबाबत आदेश आले नव्हते. मात्र आज सरकार कडून आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार गोंदिया चे जिल्हाधिकारी राहिलेले प्राजीत नायर यांची अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती केली आहे. राज्य सरकारचे सह सचिव सुभाष उमराणीकर यांनी हे आदेश जारी केले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: