Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी शहरातील काही भागातील पाणीपुरवठा राहणार बंद! 

HomeBreaking Newsपुणे

Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी शहरातील काही भागातील पाणीपुरवठा राहणार बंद! 

गणेश मुळे May 27, 2024 1:51 PM

 Emphasis of Pune Municipal corporation (PMC) Water Supply Department on breaking unauthorized taps 
Water cut in Pune on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार | जाणून घ्या परिसर
Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी शहरातील काही भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

 

Pune Water cut on Thursday – (The Karbhari News Service) – येत्या गुरुवारी पुणे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी कमी दाबाने पाणी येणार आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

गुरूवारी वडगाव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंग येथील विद्युत, पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्ती व अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे कामांसाठी तसेच धनकवडी येथील शिवशंकर चौक येथे कलवर्टचे काम सुरु आहे. सदर कामामध्ये अडथळा ठरणारी ७९६ मीमी व्यासाची पाईप लाईन शिफ्ट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उपरोक्त ठिकाणची पंपींग यंत्रणा बंद ठेवावी लागणार असल्याने उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा सदर दिवशी बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. असे महापालिकेने कळविले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

वडगाव जलकेंद्र परीसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

राजीव गांधी पंपिंग :- सच्चाई माता टाकी, संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुंदा माता नगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागर नगर मधील भाग क्रमांक एक व दोन, राजेश सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, दत्तनगर, जुना प्रभाग 38 मधील वरखडे नगर तसेच संपूर्ण जुना प्रभाग 41 व येवलेवाडी परिसर इ.