Naval Kishore Ram IAS | आपत्कालीन परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मुख्यालय न सोडण्याचे आयुक्तांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आदेश 

Homeadministrative

Naval Kishore Ram IAS | आपत्कालीन परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मुख्यालय न सोडण्याचे आयुक्तांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आदेश 

Ganesh Kumar Mule Apr 02, 2026 10:02 PM

Joint Municipal Commissioner PMC | आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने आता सह महापालिका आयुक्त!
Pune Underground Ring Road | पाताल लोक चा आराखडा आठवडाभरात राज्य सरकारला केला जाणार सादर! : महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती
PMC Reinstatement Works शहरातील रिइंस्टेटमेंट अर्थात खोदकामानंतरची  पुनर्स्थापना कामे आता फक्त पथ विभागच करणार!

Naval Kishore Ram IAS | आपत्कालीन परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मुख्यालय न सोडण्याचे आयुक्तांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आदेश!

 

 

Pune Rain News – (The Karbhari News Service) – अवकाळी पावसाच्या काळात अतिवृष्टी, पाणी साचणे, पूरस्थिती इत्यादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली आहे. त्यानुसार सद्यस्थितीत उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत संबंधित अधिकारी / कर्मचारी यांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मुख्यालय सोडू नये.असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जारी केले आहेत. (Pune PMC News)

नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देऊन तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून कार्यवाही करावी. तसेच आवश्यकतेनुसार पाणी निचरा, रस्ते स्वच्छता, धोकादायक स्थळांची पाहणी व इतर उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्या. असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

वरिष्ठ अधिकारी यांना परिस्थितीबाबत वेळोवेळी अवगत करण्यात यावे. यामध्ये कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांविरुद्ध प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. असा इशारा देखील आयुक्तांनी दिला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: