Pune Property Tax | प्रॉपर्टी टॅक्स मधून पुणे महापालिकेच्या तिजोरीत 2273 कोटी जमा | मागील वर्षीपेक्षा 308 कोटी ने अधिक उत्पन्न

HomeपुणेBreaking News

Pune Property Tax | प्रॉपर्टी टॅक्स मधून पुणे महापालिकेच्या तिजोरीत 2273 कोटी जमा | मागील वर्षीपेक्षा 308 कोटी ने अधिक उत्पन्न

गणेश मुळे Apr 01, 2024 2:10 AM

  5182 crores owed to the Pune municipal corporation by only 1746 big people with arrears of more than 1 crore
Pune Property Tax | मिळकत कर वसुलीसाठी दामिनी महिलांची 12 पथके | कर वसुलीसाठी पहिल्यांदाच महिलांना जबाबदारी 
2090 crore collected in the coffers of Pune Municipal Corporation from property tax

Pune Property Tax | प्रॉपर्टी टॅक्स मधून पुणे महापालिकेच्या तिजोरीत 2273 कोटी जमा | मागील वर्षीपेक्षा 308 कोटी ने अधिक उत्पन्न

PMC Property Tax – (The Karbhari News Service) – 2024-25 या आर्थिक वर्षात 11 लाख 91 हजार 473 मिळकतधारकांनी मिळकत कराच्या स्वरूपात महापालिका तिजोरीत 2073 कोटी इतके जमा केलेले आहेत. ही रक्कम पूर्वीच्या म्हणजेच 2023-24 या वर्षाच्या जमेपेक्षा रक्कम 308 कोटी इतक्या रक्कमेने अधिक आहे. अशी माहिती महापालिका प्रॉपर्टी टॅक्स विभागाच्या (Pune Municipal Corporation Property Tax Department) वतीने देण्यात आली. (PMC Property tax)

पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कर विभागाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी दिलेल्या उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नियोजन केलेले होते. त्यादृष्टीने २०२४-२५ या आर्थिक वर्षाची मिळकत कराची बिले छपाई करून दिनांक 1 एप्रिल पासूनच पोस्ट विभागामार्फत वितरीत करण्यास आली. तसेच अर्धवट पत्त्या अभावी परत येणारे मिळकतकराची बिले स्पीड पोस्ट द्वारे मिळकत धारकांना पाठवून मिळकतधारकांची नाव व पत्ता इ. माहिती अद्यावत करण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

टॅक्स विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार मागील वर्षी महापालिकेला 1965 कोटी मिळाले होते. तर वर्षी 2273 कोटी मिळाले आहेत. यात सर्वाधिक भरणा हा ऑनलाईन च्या माध्यमातून झाला आहे. 55% लोकांनी म्हणजे 6 लाख 58 हजार 911 मिळकतधारकांनी 1175 कोटींचा भरणा केला आहे. 33% म्हणजे 3 लाख 96 हजार 347 लोकांनी नगद (cash) स्वरूपात 285 कोटींची रक्कम जमा केली. तर 11% म्हणजे 1 लाख 36 हजार 205 मिळकतधारकांनी चेक च्या माध्यमातून 805 कोटी रक्कम जमा केली.

31 मे अखेर मिळकत करामध्ये ५% ते १०% इतकी सवलत मिळणार असल्यामुळे, मिळकतधारकांनी मिळकत कर लवकरात लवकर भरावा, असे आवाहन टॅक्स विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
यासाठी CFC (नागरी सुविधा केंद्र) वर मिळकत कराची माहिती देण्यासाठी व मदतीसाठी महानगरपालिका
कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे.तसेच  online payment करण्यासाठी खालील पर्याय / सुविधा उपलब्ध आहेत:-
NetBanking, Credit Card, Debit Card, Bharat QR Code, UPI – Google Pay, UPI –
PhonePe, Post_Debit_Card, UPI, Pos_Credit_Card, EBPP, Mobile Wallet