PMC Property tax Abhay Yojana | अभय योजनेस एक महिन्याची (१५ मार्च पर्यंत) मुदतवाढ  | सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या मागणीनंतर प्रशासनाकडून तत्काळ निर्णय 

HomeBreaking News

PMC Property tax Abhay Yojana | अभय योजनेस एक महिन्याची (१५ मार्च पर्यंत) मुदतवाढ  | सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या मागणीनंतर प्रशासनाकडून तत्काळ निर्णय 

Ganesh Kumar Mule Feb 13, 2026 8:18 PM

International Heart Day 2025 | जागतिक हृदय दिनानिमित्त महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी  सीपीआर (CPR) प्रशिक्षण!
TP Scheme PMRDA | टीपी स्कीमच्या माध्यमातून सुनियोजित शहर उभे करणार | शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन झाल्याशिवाय पीएमआरडीए पुढील प्रक्रिया करणार नाही
Pune City Survey | बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाण सिटी सर्वे प्रक्रियेला सुरुवात – दिलीप वेडेपाटील यांच्या अथक प्रयत्नांना यश

PMC Property tax Abhay Yojana | अभय योजनेस एक महिन्याची मुदतवाढ  | सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या मागणीनंतर प्रशासनाकडून तत्काळ निर्णय!

 

Ganesh Bidkar – (The Karbhari News Service) –  महापालिकेकडून मिळकतकराची थकीत रक्कम 75 टक्के सवलतीत भरण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‌अभय योजनेची मुदत 15 फेबुवारी रोजी संपणार आहे. पुणेकर मिळकत धारकांकडून या योजनेस उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून थकबाकीदारांकडून मोठ्या प्रमाणात थकीत कर देखील भरण्यात आलेला आहे. त्यामुळे योजनेस आणखीन एक महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाने तत्काळ निर्णय घेऊन अभय योजनेस १५ मार्च पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  (PMC House Leader Ganesh Bidkar)

कर संकलन विभागाकडून ही योजना १५ नोव्हेंबर पासून लागू करण्यात आली. मोठ्या प्रमाणात करवसुली झाली असली, तरी अनेक थकबाकीदारांनी अद्यापही कर भरणा करणे बाकी आहे. योजनेस एक महिन्यांची मुदतवाढ दिल्यास महापालिकेच्या महसुलात वाढ होतानाच पुणेकरांना देखील फायदा होणार आहे. त्यामुळे १५ मार्च २०२६ पर्यंत अभय योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी गणेश बिडकर यांनी केली होती.

——

“अभय योजनेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून महापालिकेच्या महसुलात वाढ झाली आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत जवळपास १ लाख ३५ हजारांच्यावर मिळकतकर धारकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, ८०१ कोटी रुपयांपेक्षा जास्त कराची वसुली झाली आहे. पालिकेचा महसूल वाढवणे आणि नागरिकांना सवलतीचा लाभ देण्यासाठी योजना अत्यंत महत्त्वाची आहे. पुणेकरांना आणखी एक संधी देण्यासाठी अभय योजनेस १५ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रशासनाने माझी मागणी पूर्ण करत अभय योजनेस मुदतवाढ दिली आहे.

गणेश बिडकर, सभागृह नेते


अभय  योजने अंतर्गत थकीत कराचे व्याजाच्या रक्कमेवर ७५% सवलत देण्यात येत आहे. अभय योजना प्रथम १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ रोजी पर्यंत राबविण्यात आली होती. तदनंतर १६ जानेवारी २०२६ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीसाठी योजनेस मुदतवाढ देण्यात आली. सदस्यांच्या व नागरिकांच्या मागणीनुसार  अभय योजनेस  १५ मार्च २०२६ पर्यंत मुदत वाढ देण्यात येत आहे. सर्व मिळकतकर थकबाकीदार यांनी सदर मुदत वाढीचा लाभ घेऊन स्वयंस्फूर्तीने थकीत कर भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे.

| रवी पवार, उपायुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: