PMC Retirement 2026 | एप्रिल  महिन्यात पुणे महापालिकेचे 58 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

Homeadministrative

PMC Retirement 2026 | एप्रिल  महिन्यात पुणे महापालिकेचे 58 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

Ganesh Kumar Mule May 01, 2026 8:12 AM

PMC Water Budget 2024-25 | पुणे महापालिकेचे २०२४-२५ साठी २१.४८ TMC पाण्याचे अंदाजपत्रक जलसंपदा विभागाला सादर
PMC Employees Accident Insurance | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना! | आतापर्यंत २३ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना फायदा
Swine Flu | PMC | शहरात स्वाईन फ्लू वेगाने पसरतोय  | ऑगस्ट च्या पहिल्याच आठवड्यात १५९ positive रुग्ण 

PMC Retirement 2026 | एप्रिल  महिन्यात पुणे महापालिकेचे 58 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

 

PMC Retired Employees – (The Karbhari News Service) -एप्रिल, 2026 महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 58 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune)

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्याख्याते विजय नवले हे उपस्थित होते.  नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवापुर्ती समारंभाची पार्श्वभूमी सांगून सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली. तसेच कोणत्याही सेवकास काही अडचण आल्यास त्यांनी कामगार कल्याण विभागास भेट द्यावी, असे आवाहन केले व सर्वाना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सेवानिवृत्त होणारे राजेश उरडे, अधीक्षक व  सुनिता भानुदास भैरवकर, मुख्याध्यापिका यांनी पुणे महानगरपालिकेत केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुणे महानगरपालिकेचे आभार मानले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.

विजय नवले यांनी सेवानिवृत्त सेवकांना त्यांच्या ईच्छा पूर्ण करा, प्रत्येकाने रोज एक तास व्यायाम करा, आपली दुसरी इनिंग सुरू झाली आहे, काही व्यक्तींनी त्यांच्या करिअरची सुरवात साठी पार झाल्यानंतर केली व त्यांनी खूप नाव कमावले, त्याप्रमाणे तुम्हीही नवीन सुरवात करू शकता, कायम आशावादी रहायला पाहिजे, आपले आरोग्य सांभाळा, आपल्या चेहऱ्यावरील स्मितहास्य कधीच घालवू नका असे नमूद करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अलका जोशी व आयोजन  महेश मुंडलिक यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: