PMC Standing Committee Chairman | स्थायी समिती अध्यक्ष निवड प्रक्रियेसाठी महापालिकेचा विभागीय आयुक्तांशी पत्रव्यवहार | अध्यक्ष पदासाठी श्रीनाथ भिमाले यांच्या नावाची चर्चा 

Homeadministrative

PMC Standing Committee Chairman | स्थायी समिती अध्यक्ष निवड प्रक्रियेसाठी महापालिकेचा विभागीय आयुक्तांशी पत्रव्यवहार | अध्यक्ष पदासाठी श्रीनाथ भिमाले यांच्या नावाची चर्चा 

Ganesh Kumar Mule Feb 13, 2026 7:56 PM

PMC Pune Shahari Garib Yojana | गरिबांनाच मिळतो आहे शहरी गरीब योजनेचा लाभ! | येरवडा परिसरातील गरिबांनी घेतला सगळ्यात जास्त लाभ
Urban Poor Medical Scheme | शहरी गरीब वैद्यकीय योजना | उत्पन्न मर्यादेबाबत पुणे महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय 
Arvind Shinde | PMC Pune | पुणे महापालिकेतील बदली घोटाळा रोखा | अरविंद शिंदे यांची नगरविकास मंत्र्यांकडे मागणी

PMC Standing Committee Chairman | स्थायी समिती अध्यक्ष निवड प्रक्रियेसाठी महापालिकेचा विभागीय आयुक्तांशी पत्रव्यवहार | अध्यक्ष पदासाठी श्रीनाथ भिमाले यांच्या नावाची चर्चा

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत स्थायी समिती सह ७ विषय समित्या अस्तिवात आल्या आहेत. या सर्व समित्यांवर सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. आता या समित्यांसाठी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया बाकी आहे. ही प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरु करण्यात आली आहे. सुरुवातीला स्थायी समिती चा अध्यक्ष निवडला जाणार आहे. या अध्यक्ष निवड प्रक्रियेसाठी महापालिकेकडून विभागीय आयुक्त यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. अशी माहिती नगरसचिव योगिता भोसले यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)

नगरसचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला स्थायी समितीचा अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. त्यानंतर बाकी समित्यांचे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानुसार स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रीयासाठी विभागीय आयुक्त यांना पत्र देण्यात आले आहे. या निवडीसाठी विभागीय आयुक्त यांना तारीख, वेळ आणि पीठासीन अधिकारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त यांचे उत्तर आल्यानंतर लवकरच याची प्रकिया सुरु केली जाणार आहे.

| अध्यक्ष पदासाठी प्रदेश भाजप कुणाला संधी देणार!

दरम्यान स्थायी समिती सदस्य पदासाठी पक्षीय बलाबल नुसार भाजप कडून १२ सदस्य देण्यात आले आहेत. यामध्ये  रुपाली धाडवे, कालिंदा पुंडे, जयश्री भुमकर, विशाल धनवडे, रत्नमाला सातव, प्राची आल्हाट, श्रीनाथ भिमाले, मयूरी कोकाटे, डॉ कोद्रे दादा, वृषाली कामठे, निशा मानवतकर आणि संदीप बेलदरे यांची नियुक्ती केली आहे. भाजपचे बळ जास्त असल्याने साहजिकच त्यांचा अध्यक्ष असणार आहे.

अध्यक्ष पदासाठी माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या नावाची चर्चा केली जात आहे. भिमाले यांना महापालिका कामाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आहे. असे जरी असले तरी भाजपची एक कार्यपद्धती आहे. भाजपचे सर्वच निर्णय हे प्रदेश पातळी वरून घेतले जातात. अध्यक्ष पदाचे नाव देखील प्रदेश पातळीवरून ठरले जाणार आहे. त्यामुळे प्रदेश कुणाला संधी देणार, हे पाहणे महत्वाचे आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: