PMC Bus Pass Reimbursement | बसपासच्या प्रतिपूर्तीसाठी पीएमपीला २३.११ कोटी रुपये! | ३४.८७ कोटींच्या मागणीपैकी सध्या २३.११ कोटींनाच मंजुरी

बसपास प्रतिपूर्तीपोटी पीएमपीला २३.११ कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता

Homeadministrative

PMC Bus Pass Reimbursement | बसपासच्या प्रतिपूर्तीसाठी पीएमपीला २३.११ कोटी रुपये! | ३४.८७ कोटींच्या मागणीपैकी सध्या २३.११ कोटींनाच मंजुरी

Ganesh Kumar Mule Nov 05, 2026 8:52 PM

PMPML 7th Pay Commission | सातवा वेतन आयोग फरकापोटी पीएमपीला ८४ कोटी देण्यास मंजुरी
PMC Call Center | Command and Control Center | कमांड सेंटर चा निधी कॉल सेंटर च्या कामासाठी!
PMC Recruitment Portal | महापालिकेच्या सर्व प्रकारच्या भरतीसाठी ऑनलाइन पोर्टल अंतिम टप्प्यात | बनावट भरती रॅकेटविरोधात कठोर कारवाईचे श्रीनाथ भिमाले यांचे निर्देश

PMC Bus Pass Reimbursement | बसपासच्या प्रतिपूर्तीसाठी पीएमपीला २३.११ कोटी रुपये! | ३४.८७ कोटींच्या मागणीपैकी सध्या २३.११ कोटींनाच मंजुरी

 

PMC Standing Committee – The Karbhari News Service – विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आणि महापालिका कर्मचाऱ्यांना दिलेल्या मोफत व सवलतीच्या बसपासपोटी पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) २३ कोटी ११ लाख रुपये देण्यात येणार आहेत. पीएमपीने सादर केलेल्या बिलांची तपासणी करून महापालिकेच्या विविध विभागांनी ३४ कोटी ८७ लाख रुपयांची शिफारस केली आहे. मात्र, अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद नसल्याने सध्या २३ कोटी ११ लाख रुपये देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (Shrinath Bhimale PMC)

पीएमपीकडून महापालिकेच्या विविध योजनांतर्गत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि महापालिका कर्मचाऱ्यांना मोफत अथवा सवलतीच्या दरात बसपास दिले जातात. या सवलतींची रक्कम महापालिकेकडून पीएमपीला दिली जाते. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील बसपासपोटी पीएमपीने ३६ कोटी १८ लाख ४० हजार रुपयांची मागणी केली होती. त्याची संबंधित विभागांकडून तपासणी केल्यानंतर ३४ कोटी ८७ लाख ५५ हजार रुपये देण्याची शिफारस करण्यात आली.

यामध्ये विद्यार्थ्यांचे वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि ५० टक्के सवलतीचे पास, ज्येष्ठ नागरिकांचे पास, स्वातंत्र्यसैनिकांचे मोफत पास, विशेष प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींचे पास आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या पासचा समावेश आहे. दैनिक व साप्ताहिक वर्तमानपत्रांच्या वार्ताहरांना दिलेल्या मोफत बसपासपोटी ७१ हजार ३०० रुपये देण्याची शिफारस माहिती व जनसंपर्क कार्यालयाने केली आहे.

दरम्यान, २२ दिवसांच्या प्रवासी पंचिंग पासपोटी पीएमपीने मागणी केलेल्या एक कोटी २७ लाख रुपयांची शिफारस संबंधित विभागांनी केलेली नाही. त्यामुळे पीएमपीची मागणी आणि महापालिकेने तपासणीनंतर निश्चित केलेल्या रकमेत तफावत आहे.

पीएमपीने दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान आणि बक्षीस देण्यासाठी ३३ कोटी रुपये आगाऊ देण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता.

महापालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात बसपासच्या प्रतिपूर्तीसाठी २३ कोटी ११ लाख रुपयांची तरतूद आहे. त्यामुळे शिफारस केलेल्या रकमेपैकी सुमारे ११ कोटी ७७ लाख रुपये देण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता भासणार आहे. मुख्य सभेच्या मान्यतेनंतर उपलब्ध तरतुदीतून पीएमपीला रक्कम दिली जाणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: