PMC Encroachment Action | मेट्रो च्या जागेतील ५० अनधिकृत झोपड्या हटवल्या | महापालिका आणि मेट्रो प्रशासनाची कारवाई!

Homeadministrative

PMC Encroachment Action | मेट्रो च्या जागेतील ५० अनधिकृत झोपड्या हटवल्या | महापालिका आणि मेट्रो प्रशासनाची कारवाई!

Ganesh Kumar Mule Jan 16, 2025 10:16 PM

Water Closure | महत्वाची बातमी | गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद
NCP Pune | Sharad Pawar | पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यांच्या सोबत | कार्यकारिणी बैठकीत केला ठराव
PMC Encroachment Action | औंध मधील साई चौकात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे मनपाची संयुक्त कारवाई | आज रात्रीच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार 

PMC Encroachment Action | मेट्रो च्या जागेतील ५० अनधिकृत झोपड्या हटवल्या | महापालिका आणि मेट्रो प्रशासनाची कारवाई!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनच्या (Shivajinagar Civil court Metro Station) डेंगळे पुलालगतच्या जागेत मागील काही महिन्यात अंदाजे ५० अनधिकृत झोपड्या मेट्रोच्या जागेत अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या होत्या. या अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करून अतिक्रमण हटविणेबाबत, पुणे महानगरपालिकेकडे (Pune Municipal  Corporation) पुणे मेट्रो (Pune Metro) यांचेमार्फत मागणी करण्यात आली होती. (Pune Municipal Corporation – PMC)

१६ जानेवारी  रोजी उप आयुक्त अविनाश सकपाळ (परिमंडळ क्र. २) यांच्या मार्गदर्शनाखाली  गोविंद दांगट, महापालिका सहाय्यक आयुक्त शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालय यांचे नियंत्रणाखाली उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, पोलिस निरिक्षक -४ पीएसआय १५, अमलदार पोलीस ७८ सुरक्षा अधिकारी व इतर ५० व गवनि विभागाचे ४ कर्मचारी पुणे मेट्रो, अतिक्रमण विभागामार्फत जिल्हा न्यायालय, पुणे मेट्रो या जागेतील अनधिकृत अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली वा सदरचे मटेरीअल मेट्रो विभागाच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे.

कारवाई ५:३० वाजता ते १०:०० वाजता च्या दरम्यान पार पाडण्यात आली. या कामी पुणे महानगरपालिका व मेट्रो पुणे यांनी संयुक्त कारवाई केली, यात जेसीबी २ nos ICER टेम्पो ०६ nos हायड्रा० १ Nos, Labour ४o nos या बरोबर मेट्रो कडून त्यांचे अमोलकुमार मोहोळकर (मुख्य प्रकल्प व्यवस्थापक) आणि सोबत त्यांचा सर्व स्टाफ उपलब्ध होता. त्यात लाकडेवाचे पत्रे, कबुतरांच्या ढाबळीचे पिंजरे इत्यादी जप्त करण्यात आले.  कारवाई मध्ये क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक १, अतिक्रमण निरीक्षक २ सहा अतिक्रमण निरीक्षक ५. बिगारी सेवक ८ यांच्या समवेत कारवाई करण्यात आले.

खासदार मुरलीधर मोहोळ केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री भारत सरकार यांचे अध्यक्षतेखाली व नामदार चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे उपस्थित नवीन प्रशासकीय इमारत पुणे महानगरपालिका येथे ०४ जानेवारी रोजी बैठक झाली.  या बैठकीमध्ये अनधिकृत फेरीवाले अतिक्रमण काढणेबाबत चर्चा झाली. सदर चर्चेच्या अनुषंगाने मा. महापालिका आयुक्त तथा प्रशासक पुणे महानगरपालिका यांनी अतिक्रमणे काढणे बाबत आदेश दिले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0