PMC Merged 23 Villages DP | पुणे महापालिका सभागृहाचा महत्त्वपूर्ण निर्णय |  समाविष्ट २३ गावांसाठी विकास आराखडा तयार करण्यास मान्यता

Homeadministrative

PMC Merged 23 Villages DP | पुणे महापालिका सभागृहाचा महत्त्वपूर्ण निर्णय |  समाविष्ट २३ गावांसाठी विकास आराखडा तयार करण्यास मान्यता

Ganesh Kumar Mule Jun 22, 2026 9:07 PM

Ganesh Bidkar on Ravindra Dhangekar | देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांवर बोलणारे तोंड काळे करून पळाले! | बिल्डर आत्महत्या प्रकरणात गणेश बिडकरांचा धंगेकरांवर हल्लाबोल
Pune PMC News | सखल भागांतील पाणी साचण्याच्या समस्यांवर युद्धपातळीवर उपाययोजना करा – सभागृह नेते गणेश बिडकर
Ganesh Bidkar BJP | गणेश बिडकर यांची पुणे महानगरपालिका निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती! | मुरलीधर मोहोळ जिल्हा प्रभारी

PMC Merged 23 Villages DP | पुणे महापालिका सभागृहाचा महत्त्वपूर्ण निर्णय |  समाविष्ट २३ गावांसाठी विकास आराखडा तयार करण्यास मान्यता

| शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर पाहणार नगररचना अधिकारी म्हणून काम

 

PMC GB – (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिका हद्दीत सन २०२१ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांच्या नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीने आज पुणे महानगरपालिका सभागृहात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सभागृहाने या गावांसाठी प्रारूप विकास आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेस एकमताने मंजुरी दिली असून, लवकरच या गावांसाठी सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यास सुरवात होणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

समाविष्ट गावांचा विकास अधिक प्रभावी, नियोजनबद्ध आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम पद्धतीने करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता  अनिरुद्ध पावसकर यांची नगररचना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यासही सभागृहाने मान्यता दिली आहे.

या निर्णयामुळे समाविष्ट गावांमध्ये भविष्यातील रस्ते विकास, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, सार्वजनिक सुविधा, शैक्षणिक व आरोग्य सुविधा, आरक्षणे, वाहतूक नियोजन तसेच शाश्वत नागरी विकासाला स्पष्ट दिशा मिळणार आहे. अनियोजित वाढीऐवजी संतुलित आणि नागरिककेंद्रित विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

———–

“पुण्याच्या विस्तार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून नागरिकांच्या अपेक्षेनुसार आधुनिक आणि सक्षम नागरी सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने हे निर्णायक पाऊल आहे. समाविष्ट २३ गावांच्या नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन विकासासाठी आजचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. विकास आराखड्यामुळे रस्ते, पाणी, सांडपाणी, सार्वजनिक सुविधा आणि भविष्यातील नागरी विकासाला स्पष्ट दिशा मिळणार आहे. नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी आणि समतोल विकास साधण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.”

| गणेश बिडकर, सभागृह नेते

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: