PMC Employees Transfer | पुणे महापालिकेतील बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची नवीन खात्यात जाण्यास टाळाटाळ

Homeadministrative

PMC Employees Transfer | पुणे महापालिकेतील बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची नवीन खात्यात जाण्यास टाळाटाळ

Ganesh Kumar Mule Aug 31, 2026 12:48 PM

PMC JE Bharti News | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची उद्यापासून पडताळणी  | ५४५ उमेदवार पात्र
Pune PMC News | खाऊ पासून मुले वंचित राहणर नाहीत  | उपायुक्त किशोरी शिंदे यांची माहिती 
Pune PMC News | छपाई कामासाठी लागणारे रील पेपर, कार्डशीट पेपर खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा तुषार पाटील यांचा आरोप  | मागील वर्षीच्या टेंडर प्रमाणेच टेंडर लावल्याचा उपायुक्त यांचा खुलासा 

PMC Employees Transfer | पुणे महापालिकेतील बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची नवीन खात्यात जाण्यास टाळाटाळ

 1 ऑगस्टला रुजू होण्याचे आदेश असताना हजर नाही, उप आयुक्तांचे कडक परिपत्रक

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील नियतकालिक बदल्यांमध्ये बदली झालेले कर्मचारी नवीन खात्यात रुजू होण्यास टाळाटाळ करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याची गंभीर दखल घेत सामान्य प्रशासन विभागाच्या उप आयुक्त किशोरी शिंदे यांनी कडक शब्दात कार्यालयीन परिपत्रक काढले आहे. (PMC GAD)

पुणे मनपा आस्थापनेवरील उप अधीक्षक, वरिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखक या पदावरील सेवकांच्या संदर्भाधीन तीन आज्ञापत्रान्वये नियतकालिक बदली करण्यात आली होती. आज्ञापत्रानुसार बदली झालेल्या सर्व सेवकांनी  01/08/2026 रोजी प्रत्यक्ष बदली झालेल्या खात्यामध्ये रुजू व्हावे* आणि बदलीच्या खात्यामध्ये रुजू झाल्याचा अहवाल 07/08/2026 पर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावा, असे नमूद होते.

परंतु निदर्शनास आले आहे की, मुदत संपून 20 दिवस उलटले तरी अद्यापही काही सेवक बदलीच्या खात्यामध्ये हजर झाले नाहीत.

बाब अतिशय गंभीर असून” असे नमूद करत उप आयुक्तांनी सर्व खातेप्रमुखांना आदेश दिले आहेत की, बदली झालेल्या सेवकांना बदलीच्या खात्यामध्ये रुजू होण्याकरिता त्वरित कार्यमुक्त करावे आणि सेवक रुजू झाल्याचा अहवाल संबंधित खातेप्रमुखांनी त्वरित आस्थापना विभागाकडे सादर करावा.

भविष्यात या बाबत तक्रारी प्राप्त झाल्यास,  आज्ञापत्रामधील अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) यांनी दिलेल्या निर्देशानुसार दोन्ही खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल,  याची नोंद घ्यावी, असा कडक इशारा या परिपत्रकात देण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: